शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

थोरलेवाडी येथून चंदनाच्या झाडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

थोडगा शिवारातून आंब्याच्या झाडांची चोरी लातूर : अहमदपूर तालुक्यातील थोडगा शेतशिवारातून आंब्याच्या पाच झाडांची चोरी झाल्याची घटना ८ ते ...

थोडगा शिवारातून आंब्याच्या झाडांची चोरी

लातूर : अहमदपूर तालुक्यातील थोडगा शेतशिवारातून आंब्याच्या पाच झाडांची चोरी झाल्याची घटना ८ ते ९ मे रोजी घडली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी राहुल रमेश कागणे (रा. टेंभुर्णी रोड, अहमदपूर) यांच्या शेतातील आंब्याची पाच झाडे अंदाजे किंमत १० हजार रुपये कोणी तरी अज्ञात चोरट्याने कापून चोरून नेली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. बडे करीत आहेत.

पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : शेतातील आखाड्यावर म्हशीचे दूध आणण्यासाठी गेले असता संगनमत करून पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत एकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी विजयकुमार नागोराव पत्की (टाकळगाव, ता. अहमदपूर) हे टाकळगाव शेतशिवारातील आपल्या शेतातील आखाड्यावर म्हशीचे दूध आणण्यासाठी गेले असता तिघा जणांनी संगनमत करून आखाड्यावर येऊन फिर्यादीस पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच हाताच्या बोटावर मारून जखमी केले. काठीने कमरेवर मारून जखमी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विजयकुमार पत्की यांच्या तक्रारीवरून वसंत ज्ञानोबा दराडे व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध (सर्व, रा. टाकळगाव) यांच्याविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मुरकुटे करीत आहेत.