शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

लातूर : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बारावीचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळाने दहावीचे ३०, अकरावीचे ३० ...

लातूर : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बारावीचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळाने दहावीचे ३०, अकरावीचे ३० आणि बारावीचे ४० टक्के असे निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागली आहे. दहावी, अकरावी आणि बारावी असे तिन्ही मिळून सरासरी गुण बारावीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे बारावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील बारावीचे सीबीएसई विद्यार्थी - मुले - २५० मुली - २२०

जिल्ह्यातील बारावीचे स्टेट बोर्ड विद्यार्थी - मुले - १७,२०० मुली - १६,१००

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार...

दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर अकरावीला नियमित कॉलेज केले. बारावीचे वर्ग कोरोनामुळे ऑनलाइन झाले. त्यात परीक्षा झालीच नाही. त्यामुळे दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित गुणाचे सूत्र निकालावर परिणाम करणारे ठरते की काय असा प्रश्न आहे. निकाल लागणार असल्याने चिंता आहे. मात्र, चांगली टक्केवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. - प्रणव बिडवे, विद्यार्थी

बारावीचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्याने दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित मूल्यमापन केले जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे अभ्यास सुरूच असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागलेली आहे. - गणेश पाटील, विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा...

बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिलेले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे मिळून निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत चिंता न बाळगता पुढील अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या परीक्षांची तयारी करावी. नीट, जेईई, सीईटी याकडे लक्ष दिल्यास पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे सुकर होईल. - श्रीनिवास पाटील, प्राचार्य

बारावीचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांवर आधारित आहे. महाविद्यालयांच्या वतीनेही निकालाची कामे अंतिम टप्यात आहेत. विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करावी. कारण नीट, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र परीक्षा होत असते. त्यामुळे बारावीच्या निकालाची चिंता करण्यापेक्षा पुढील अभ्यासक्रमासाठी गरजेच्या असलेल्या परीक्षांवर फोकस करावा. - गाेविंद शिंदे, प्राचार्य