शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतेय वडवळचे संजीवनी बेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

वडवळ नागनाथ : दुर्मीळ वनस्पतींचा खजिना व नैसर्गिक वैभव प्राप्त असलेल्या वडवळ नागनाथ परिसरातील संजीवनी बेटाने पावसामुळे हिरवा शालू ...

वडवळ नागनाथ : दुर्मीळ वनस्पतींचा खजिना व नैसर्गिक वैभव प्राप्त असलेल्या वडवळ नागनाथ परिसरातील संजीवनी बेटाने पावसामुळे हिरवा शालू पांघरला असून, हे बेट उत्तरा नक्षत्राच्या प्रारंभी पर्यटकांना खुणावत आहे.

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वडवळ नागनाथ परिसरातील संजीवनी बेटावर हिरवळ पसरली आहे. महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटन केंद्र व्हावे म्हणून या बेटाला पर्यटनाचा 'क' दर्जा आहे. दुर्मीळ वनोषधीचा येथे खजिना असल्याने दरवर्षीच्या उत्तारा नक्षत्रात पर्यटकांची अलोट गर्दी असते. वर्षभरही या संजीवनीच्या पर्यटन स्थळाला राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून पर्यटकांसह शाळा, महाविद्यालयांच्या सहली भेट देतात. या बेटावर दुर्मीळ वनौषधी वर प्रक्रिया करणारे केंद्र व्हावे रसशाळा, पंचकर्माचे युनिट, आयुर्वेद काॅलेज व्हावे, अशी ही मागणी होत आहे; मात्र शासनाचे या बेटाकडे दुर्लक्ष असल्याने संजीवन बेट विकासापासून वंचित आहे. बेटावर वनस्पतीच्या सेवनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील रुग्ण दाखल होतात. या बेटावरील वनस्पती व मातीचे आर्युेवेद तज्ज्ञांनी परिक्षण केले आहे. बेटावरील माती लालसर रंगाची असून, लोहाचे ३३ टक्के प्रमाण आहे. हा भाग समुद्र सपाटीपासून १ हजार फूट उंचीवर असल्याने येथील हवा शुद्ध असल्याने येथील वनस्पती गुणकारी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

या बेटावर आहे दुर्मीळ वनस्पती...

या संजवनी बेटावर राजहंस, निर्मळी, शंखपुष्पी, काळी टाकळी, आडसुळा, गुळवेल, शतावरी, जटाशंकर, अनंतमुळ, सर्पगंधा, सफेद मुसळी, कवच बीज, कोरफड, रानमिरची, भुईकोहळा, पाषाणकंद, मदनफळ, लोखंडी खडक शेपु यांसह दुर्मीळ वनस्पती आहेत. या बेटावर वनस्पतीचे संवर्धन, संरक्षण, संशोधन होणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी पाण्याची सोयही आवश्यक असून, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.