शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई ...

बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई कर्मचारी तसेच शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत, याचा बँकेच्या ग्राहक सेवेवर विपिरित परिणाम होत असून ग्राहकांना अनावश्यक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय सरकार आता बँकातून प्रधानमंत्री जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री वय वंदन योजना, मुद्रा योजना, स्टॅन्ड अप इंडिया, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम बँकेमार्फत राबवत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी फक्त एक दिवसाची देखील रजा घेता येत नाही. याबरोबरच बँकेने शाखा तसेच एटीएम वर नेमलेले सुरक्षारक्षक काढून टाकले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांत एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. व्यवस्थापन शिपाई ते क्लार्क तसेच क्लार्क ते अधिकारी पदोन्नतीत देखील चालढकल करत असल्याचा आरोप कॉ.धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे.

निदर्शने, धरणे आणि संप

२३ फेब्रुवारी रोजी सर्व शाखांसमोर निदर्शने, २६ रोजी झोनल ऑफिसेस पुढे धरणे तर सहा मार्चला महा बँकेचे मुख्य कार्यालय पुणे येथे संघटनेतर्फे महा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे ज्यात देशभरातील पाचशेवर कर्मचारी सहभागी होतील आणि एवढे करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सन्माननीय तोडगा निघाला नाही तर महा बँकेतील एआईबीइएचे सहा हजारावर सभासद १२ मार्च रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करतील, असे कॉ. कुलकर्णी म्हणाले.