लातूर शहरासह जिल्हाभरात फॅन्सी नंबरप्लेट आणि माेठ्या आवाजाच्या सायलेन्सर विराेधात कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे; मात्र तत्पूर्वी पाेलीस दलातही नियमबाह्य प्रकाराला राेखण्याबाबत पाेलीस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, पाेलीस दलातील अधिकारी, अंमलदार हे वापरत असलेल्या खासगी बुलेट सायलेन्सर, आवाज माेठा येण्यासाठी त्यामध्ये बदल करण्यात आल्याचे समाेर आले आहे. शिवाय, त्यांच्याकडे वापरात असलेल्या माेटारसायकललाही फॅन्सी नंबरप्लेट बसविल्याचेही निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर आहे. यासाठी पाेलीस अधिकारी, अंमलदार यांनी आपल्या खासगी वापरातील वाहनांचे माेठ्या आवाजाचे सायलेन्सर, फॅन्सी नंबरप्लेट तातडीने काढून घ्यावेत. अन्यथा, त्यांच्याविराेधात माेटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय, याबाबतचा संबंधित प्रमुखांनी अहवाल वरिष्ठांना सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.
आदेशाचे आठवडाभर हाेणार वाचन...
पाेलीस दलातील काही अधिकारी, अंमलदारांकडूनच माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन हाेत असल्याचा गंभीर प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर काेण कारवाई करणार, हा प्रश्न आजपर्यंत सामान्यांना पडला हाेता; मात्र जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मंगळवारी थेट याबाबत आदेश जारी करत कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. हा आदेश त्या-त्या पाेलीस ठाण्यात हाेणाऱ्या हजेरीच्या वेळी सलग सात दिवस वाचून दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ केला जाणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे.