शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

दिलासादायक! लातूरमध्ये मनपाच्या तीनशे बोअरचे पुनर्भरण; पाणीपातळीत वाढ

By हणमंत गायकवाड | Updated: December 30, 2023 17:54 IST

लातूरमध्ये १३० हातपंप नादुरुस्त, ४० विद्युत पंप कायमचे बंद

लातूर : मागील तीन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या ३०० बोअरचे पुनर्भरण करण्यात आले असून, यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय, पावसाळ्यापूर्वीच ८० बोअरचे पुनर्भरण करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विद्युत पंप व हातपंपाच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. १०६१ विद्युत पंप व २५४ हातपंपापैकी एकूण एक हजार शंभर बोअरद्वारे नागरिकांना पाणी मिळत आहे.

यंदाच्या पावसाळ्यामध्ये मांजरा प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही सद्य:स्थितीत २० टक्के जिवंत पाणीसाठा आहे या पाण्यावरच लातूर शहरासह अन्य शहराला मांजरा प्रकल्पातून पुरवठा होणार आहे. लातूर शहरासाठी दररोज ४० ते ५० एमएलडी पाणी प्रकल्पातून उचलले जाते. त्यावरचा थोडासा ताण कमी व्हावा, या हेतूने लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हातपंप व विद्युत पंपाच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन जिथे पाणी आहे, तिथे पंप सुरू केले आहेत. त्यानुसार शहरात सद्य:स्थितीत ९७६ विद्युत पंप आणि १२४ हातपंप सुरू आहेत. त्यातून नागरिकांना पाणी मिळते.

लातूर शहरातील विद्युत पंप व हातपंपाची स्थिती....लातूर शहरांमध्ये १०६१ विद्युत पंप आहेत. त्यापैकी ९७६ चालू आहेत, तर ४० विद्युत पंप कायमचे बंद असून, २५ विद्युत पंप वापरात नाहीत. शिवाय, वीस पंपामध्ये काही ना काही अडकून बंद पडले आहेत, तर २५४ हातपंपांची संख्या असून, यातील १२४ सद्य:स्थिती चालू आहेत. १३० हातपंप नादुरुस्त असून, फक्त १२४ पंपाचेच पाणी नागरिकांना घेता येत आहे.

मांजरा प्रकल्पात २० टक्के जिवंत पाणीसाठा.....लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातूनच शहराला पाणीपुरवठा आहे. मात्र यंदा पाऊस काळ चांगला झाला नाही. त्यामुळे प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २०.२८ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे ३५.२२८ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. जूनअखेरपर्यंत पाणी पुरवू शकते. त्यासाठीच महानगरपालिकेने थोडा आधार व्हावा म्हणून शहरातील सर्व हातपंप व विद्युत पंप सुरू केले आहेत. शिवाय, काही बोअरचे पुनर्भरण करून पाणीपातळीत वाढ करण्याचाही प्रयत्न केला आहे.

नादुरुस्त १३० हातपंपाची दुरुस्ती होणारमहापालिकेच्या अंतर्गत एकूण २५४ हातपंप आहेत. त्यापैकी १२४ हातपंप सुरू आहेत. १३० नादुरुस्त आहेत. त्यांची ही दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच वापरात नसलेल्या २५ विद्युत पंपाची दुरुस्ती होणार आहे. ज्यामुळे टंचाईत याचा फायदा होईल. त्यानुषंगाने लातूर महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी