शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

ग्रामीण विकास यंत्रणेला पाच वर्षांनंतर नियमित प्रकल्प संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

उस्मानाबाद : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास तसेच राज्य शासन पुरस्कृत घरकूल योजना राबविली जाते. या माध्यमातून ...

उस्मानाबाद : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास तसेच राज्य शासन पुरस्कृत घरकूल योजना राबविली जाते. या माध्यमातून गोरगरीब कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला जातो. एवढे महत्त्वपूर्ण पद मागील चार-पाच वर्षांपासून रिक्त होते. अखेर यशदा पुणे येथील साहाय्यक प्राध्यापक पी.पी. शिंदे यांची या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले यांची पदोन्नतीने नांदेड प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

जिल्हा परिषदेतील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेतील राऊत यांची नियुक्ती केली होती. बदली आदेशानंतर आठ ते दहा दिवसांनी ते रुजू झाले. मात्र डॉ. तुबाकले हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी म्हणून पदोन्नतीस पात्र असल्याने त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नव्हती. अखेर शासनाने नांदेड येथे समकक्ष असलेल्या प्रकल्प संचालक या पदावर नियुक्ती आहे. तुबाकले यांनी आपला कार्यकाळ विनातक्रार यशस्वीरीत्या पूर्ण केला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात त्यांनी नेहमी समन्वय ठेवला. परिणामी, प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असे चित्र अपवादानेही दिसले नाही.

दरम्यान, उस्मानाबाद प्रकल्प संचालक पदासाठी मागील पाच वर्षांपासून कोणीही वाली नव्हते. त्यामुळे हा चार्ज कायम अतिरिक्त उपमुख्य अधिकारी यांच्याकडे राहिला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला पी. पी. शिंदे (साहाय्यक प्राध्यापक यशदा, पुणे) यांच्या रूपाने नियमित प्रकल्प संचालक मिळाले आहेत. नियमित अधिकारी मिळाल्याने कामाला अधिक गती येईल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.