शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चारा-पाण्याचा प्रश्न कायम

By admin | Updated: July 31, 2014 01:24 IST

औसा : तालुक्यात यावर्षी पावसाला तब्बल महिनाभराने उशिरा सुरूवात झाली़ पेरण्या ही उशिराने झाल्या़

औसा : तालुक्यात यावर्षी पावसाला तब्बल महिनाभराने उशिरा सुरूवात झाली़ पेरण्या ही उशिराने झाल्या़ पाऊस सर्वत्र समान न झाल्यामुळे अजूनही काही भागात पेरण्या झाल्या नाहीत़ ८० ते ९० टक्के पेरण्या झाल्या़ पण अजूनही चारा आणि पाण्याचा प्रश्न मात्र गंभीरच आहे़ पेरण्यापुरता पाऊस झाला़ त्यामुळे पाणीसाठे अजूनही तळातच आहेत़ पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले पण मोठा पाऊस न झाल्यामुळे चारा उपलब्ध झाला नाही़ शेती हाच औसा तालुक्याचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीवर उपजिवीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ जनावरे पाळूण शेती करणारे शेतकरी अधिक आहेत़ तसेच दुग्ध व्यवसायासाठी दुधाची जनावरे सांभाळणारे शेतकरीही बऱ्यापैकी आहेत़ त्यामुळे तालुक्यात दीड लाखाच्या जवळपास पशुधन आहे़ शेती करण्यासाठी दोन बैल तर दुधासाठी एखाद दुसरे जनावर सर्रास शेतकऱ्याकडे पाहायला मिळते़ पण आता पेरण्या झाल्या, पाऊस झाला़ तरीही शेतकरी जनावरांच्या चाऱ्याअभावी त्रस्त आहे़मागील वर्षी पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पाऊस कमी पडल्यामुळे खरीप हंगामात चारा उपलब्ध झाला नाही़ तर रबी हंगामात पिके चांगली आल्या नंतरही गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन तर हाती लागले नाही़ पण जनावरांचा चारा ही काळा पडला त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला़ शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेला चारा ही संपला़ त्यामुळे आता पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे़ (वार्ताहर)सांगा जनावरे जगवायची कशी़़़?महाविर माळी हे शेतकरी म्हणाले २० जनावरे आहेत जमा असलेला चारा संपला़ आता जनावरे जगवायची विकावी म्हटले तरी ग्राहक मिळत नाही़ त्यामुळे जनावरे जगवायची कसे असा प्रश्न सतावतो आहे असे सांगितले़ दशरथ मगर, प्रल्हाद सरतापे, राजाभाऊ थोरात, अनंत पाटील, रूपेश दुबे या शेतकऱ्यांनी ही आशाच प्रतिक्रिया दिल्या़