शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उदगिरात व्यापाऱ्याच्या दुकानावर पुणे पाेलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST

पाेलिसांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहर पाेलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वाकड येथील पाेलिसांनी ७ सप्टेंबरराेजी राहटणी (जि. पुणे) येथे ...

पाेलिसांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहर पाेलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वाकड येथील पाेलिसांनी ७ सप्टेंबरराेजी राहटणी (जि. पुणे) येथे मल्लिकार्जुन बसवंत पाटील (२४) याच्याकडून प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा पानमसाला आणि तंबाखू असा १ लाख ३३ हजार ६४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, वाकड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाैकशीत हा पानमसाला, तंबाखू सईद खुर्शिद अहमद साबेरी (रा. खतीब कॉलनी शेल्हाळ रोड, उदगीर) याच्याकडून खरेदी केल्याचे समाेर आले. याबाबत अटकेतील मल्लिकार्जुन पाटी याने माहिती दिली.

दरम्यान, साबेरी याला १२ सप्टेंबरराेजी वाकड पाेलिसांनी अटक केली हाेती. उदगीर शहरात त्याचे दुकान असल्याची माहिती वाकड पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी उदगिरात दाखल हाेत दुकानावर छापा मारून झाडाझडती घेतली. यावेळी ३ लाख ४२ हजार १२१ रुपये आणि ४ लाख ५५ हजार २०० रुपये तसेच राेख रक्कम असा ७ लाख ९७ हजार ३२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, माल खरेदी-विक्रीच्या नोंदी असलेल्या वह्या, रजिस्टरही वाकड पोलिसांनी जप्त केले आहे, अशी माहिती तपास अधिकारी पाेलीस उपनिरीक्षक एम. के. मणेर यांनी दिली.

ही कारवाई पुणे येथील हवालदार ए. ए. काळे, डी. पी. साबळे, ए. ए. शेख, उदगीर पाेलीस ठाण्याचे गजानन पुल्लेवाड यांच्या पथकाने केली.