शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:54 IST

उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्याशी संवाद

- संदिप शिंदे लातूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर लोकसभा मतदार संघात झालेल्या जनजागृतीमुळे मतदानाचे प्रमाण वाढले़ विशेष म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंगभेद न पाहता लोकांनी मतदान करावे, यावर मोहिमेत भर देण्यात आला़ परिणामी, लातुरात चांगले मतदान झाले, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

प्रश्न : मतदान वाढीसाठी केलेल्या जनजागृतीचा किती फायदा झाला?- लातूर लोकसभा मतदार संघात आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली़ त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वंयप्रेरणेतून पुढाकार घेतला़ डोक्यावर उन्हाची तीव्रता असतानाही मतदार घराबाहेर पडले़ शिवाय, महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी सखी केंद्र, दिव्यांगाचे सक्षम केंद्र निर्माण केले़ महिला किंवा दिव्यांग सक्षमपणे निवडणूक प्रक्रियेचे काम करू शकतात, हे यातून सिद्ध झाले आहे़ 

प्रश्न : मोहिमेत कोणत्या विषयावर अधिक भर दिला?- जनजागरण मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात आले़ ‘चुनावी पाठशाला’ उपक्रमातून शाळांमध्ये मतदान केंद्र उभारून विद्यार्थ्यांकडून निवडणूक प्रक्रिया करून घेण्यात आली़ याशिवाय, संकल्पपत्रेही पालकांना पाठविण्यात आली़ महिला, दिव्यांग, अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फतही रॅली काढून जनजागरण झाले़ आई-वडिलांना विद्यार्थ्यांना लिहिलेले संकल्पपत्र हे या मोहिमेत विशेष होते़ 

प्रश्न : निवडणूक प्रक्रियेत जनजागृतीचे नियोजन कसे होते?- निवडणूक आयोगाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम देण्यात आला होता़ त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताण जाणवला नाही़ स्वीप टीम जनजागृतीसाठी स्वतंत्र होती़ शाळा, महाविद्यालयाचा सहभाग घेऊन जनजागृती झाली़ उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यावर ते प्रचाराच्या कामात लागले आणि आम्ही मतदार जनजागृतीच्या कामात लागलो़ 

प्रश्न : जनजागृतीचे नेमके धोरण काय?- निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे़ नवमतदारांना तसेच इतर मतदारांनाही मतदानाचे महत्व लक्षात आणून देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येते़ जात, धर्म, पंथ न पाहता नि:पक्ष व निर्भयपणे मतदानासाठी लोकांचा सहभाग वाढावा यासाठी मोहिम राबविण्यात आली़ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात जनजागृतीची मोहिम यशस्वी झाली़

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानlaturलातूर