या अडचणींसंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी १२ मे रोजी मनपा आयुक्त अमन मित्तल यांची भेट घेऊन विविध अडचणींची कैफियत मांडली. तेव्हा आयुक्त मित्तल यांनी रजिस्ट्रेशन साईट ही शासनाची असल्याने त्याबाबतच्या समस्यांवर आम्हाला काही करता येणार नाही. मात्र, फिजिकल डिस्टन्ससाठी मार्किंग करून देण्यात येईल. मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होईपर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे बंद केली जातील. २० मेनंतर मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
लसीकरण केंद्रावर तासन्तास उन्हात उभारल्यानंतरही काही जणांना लसीविना घरी परत जावे लागते. नागरिकांच्या सोईसाठी लसीकरण केंद्रावर पिण्याचे पाणी व सावलीसाठी मंडप टाकण्यात यावा. सदर केंद्रांवर फलक लावून त्यावर दररोज उपलब्ध लसींचे नाव, लसींची संख्या व कोणाला लस दिली जाईल हे लिहावे. नागरिकांना लसीकरणासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात दोन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप शहर उपाध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांनी केली.