शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या धान्याला मिळतोय १५ रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

लातूर जिल्ह्यात ५ लाख ९ हजार २७० रेशन कार्डधारक आहेत. त्यात ३ लाख ३० हजार केशरी, ४२ हजार अंत्योदय ...

लातूर जिल्ह्यात ५ लाख ९ हजार २७० रेशन कार्डधारक आहेत. त्यात ३ लाख ३० हजार केशरी, ४२ हजार अंत्योदय व एपीएलचे ६६ हजार ३०० लाभार्थी आहेत. यातील शेतकरी कुटुंबांना गहू २ रुपये तर तांदूळ ३ रुपये किलोप्रमाणे दिले जातात. अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना धान्य मोफतच दिले जाते. कोरोना काळात अनेकांचे काम गेले, त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने गरिबांना पोटभर अन्न मिळावे या हेतूने मोफतही धान्य दिले. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे हे धान्य काळ्या बाजारात जात असल्याचे समोर आले आहे.

स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे प्रति ३ रुपये किलो गहू व २ किलो तांदूळ काही कुटुंबात अतिरिक्त ठरत आहे. काहीजण धान्याची गुणवत्ता नसल्याने तर काहीजण अधिकची साठवणूक झाल्याने विक्री करीत आहेत. बाजारात चांगले गहू ३० ते ३५ रुपये, तांदूळ किमान ३० ते ७० रुपये किलोप्रमाणे आहेत. पाव, ब्रेड, बिस्कीट, पापड्या, पशुखाद्य बनिवणाऱ्या काही कंपन्या स्वस्तात मिळणारे रेशनचे धान्य खरेदी करीत आहेत. यासाठी गल्लीबोळात धान्य जमा करून विक्री करणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

गल्लीबोळात फिरताहेत वाहने...

लातूर शहरातील अनेक भागांत धान्य खरेदी करणारे महिन्यातून एक ते दोन वेळा फिरतात. गल्लीत फिरून अनेकांना विचारणा करतात. २ ते ३ रुपये किलोप्रमाणे घेतलेले धान्य १० ते १५ रुपये किलोने विक्री होत असल्याने अनेकांना महिन्याला जवळपास १ हजार रुपयांचा नफा होत आहे. काहींच्या घरातील माणसे शिक्षण, रोजगारासाठी बाहेरगावी आहेत, अशा लाभार्थींकडे महिना दोन महिन्यांत क्विंटलभर धान्य जमते. तेवढे खाणे शक्य नसल्याने काळ्या बाजारात विक्री केले जात असल्याचे समोर आले आहे.

गहू १२, तांदूळ १५ रुपये किलो...

पापडी, पशुखाद्य, ब्रेड आदी तयार करण्यासाठी या धान्याचा वापर केला जात आहे. गावोगावी धान्य खरेदी करणारी वाहने फिरत आहेत. शहरी भागातही अनेकजण हे धान्य संकलन करतात, असे सांगण्यात आले. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.