शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरात सातव्या दिवशी गणरायाचे शांततेत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

उदगीर : दरवर्षीच्या परंपरेनुसार उदगीर येथील गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सातव्या दिवशी जल्लोषात व ढोल-ताशांच्या मिरवणुकीसह भावपूर्ण निरोप देण्याची ...

उदगीर : दरवर्षीच्या परंपरेनुसार उदगीर येथील गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सातव्या दिवशी जल्लोषात व ढोल-ताशांच्या मिरवणुकीसह भावपूर्ण निरोप देण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासूनची आहे. पारकट्टी गल्ली येथील मानाच्या आजोबा गणपतीची आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकांना बंदी घातली होती. गणपतीच्या विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेने घेतली होती. नागरिकांनी शांततेत प्रशासनाला सहकार्य करत गुरुवारी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

दरवर्षीच्या परंपरेनुसार पारकट्टी येथील मानाच्या आजोबा सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची आरती पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते झाली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, मुख्याधिकारी भारत राठोड, माजी नगराध्यक्ष व सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष राजेश्वर निटूरे, शहर पोलीस स्थानकाचे गोरख दिवे उपस्थित होते. सकाळी ११ वाजता आजोबा गणपतीची आरती झाल्यानंतर छोट्या गणपतीची मूर्ती नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्याकडे विसर्जनासाठी देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपालिकेने सजवलेल्या वाहनात शहरातील २५ तर ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीमधील उदगीर शहरांतर्गत असलेल्या १७ अशा एकूण ५८ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणेश मंडळांचे कार्यकर्ते आरती झाल्यानंतर गणपतीच्या मूर्ती विसर्जनाला घेऊन जाण्यासाठी नगरपालिकेशी संपर्क करत होते. शहरातील विसर्जन शांततेत पार पडावे, म्हणून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी शहरात ठिकठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

नगरपालिकेकडून विसर्जनासाठी वाहनांची व्यवस्था...

नगरपालिकेच्या १८ वाहनांद्वारे शहरातील ४७ व शहरालगतच्या विविध भागातील २५ सार्वजनिक व घरगुती मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या. नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनाचे काम सुरु होते. यासाठी प्रत्येक वाहनावर एक स्वच्छता निरीक्षक, ५ कर्मचारी, एक पुजारी व चालकाची व्यवस्था करण्यात आली होती.