शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

परिमल विद्यालयाची यशाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

वाले इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल लातूर : दहावी बोर्ड परीक्षेत वाले इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, ...

वाले इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल

लातूर : दहावी बोर्ड परीक्षेत वाले इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, २९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.

शाळेतून वेंदात घुले प्रथम, वैष्णवी सुगावे द्वितीय, श्रेया शिंदे आणि रिया गायकवाड यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक मिळविला आहे. ७२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंताचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद सोनवणे, सचिव मकरंद सावे, शांतीकुमार कुचेरिया, शिवशंकर बिडवे, झकीखान कायमखानी, संदीप सावे, ममता सावे, प्राचार्य भोगडे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे यश

लातूर : तालुक्यातील मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला असून, विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातून साक्षी खुलगे प्रथम, कृष्णा रणखांब द्वितीय तर समरीन शेख हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष वामनराव शिंदे, उपाध्यक्ष कुसुमताई भोसले, सचिव हरिश्चंद्र शिंदे, सुधाकर शिंदे, मुख्याध्यापक युवराज शिंदे, सदस्य मधुकर गरड, कृष्णाबाई आगलावे, उमाकांत धोंडजी, सुहास माकणीकर, सय्यद जाकरअली, श्रीकृष्ण पवार, विलास गिरी, मंजुषा शिंदे, चंद्रकांत चोपले आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

मनोज सहदेव अकॅडमीचा शंभर टक्के निकाल

लातूर : शहरातील मनोज सहदेव अकॅडमीचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, विशेष गुणवत्ता यादीत ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सुमित पांचाळ प्रथम, वेदांत जोशी, ओंकार नागरगोजे द्वितीय तर पायल देसरडा हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राचार्य गिरीश सहदेव, सचिव विजय सहदेव सर, उपप्राचार्य प्रशांत साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

देशीकेंद्र विद्यालयातील १० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

लातूर : येथील श्री देशीकेंद्र विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, १० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत, तर ११६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

विद्यालयातील ७५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंतामध्ये आदित्य सुवर्णकार, प्रांजली भंडारे, आर्यवीर मुळे, धनंजय पांढरे, प्रथमेश सगर, आरती राठोड, गायत्री सूर्यवंशी, साक्षी तिगीले, स्नेहल मोराळे, धीरज घुले यांचा समावेश आहे. विद्यालयातील ४०९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, २४० विद्यार्थी प्रथम श्रेणी, ९५ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्याध्यापक शिवशंकरप्पा खानापुरे, मुख्याध्यापिका जयश्री ठवळे, पर्यवेक्षक विजय महाजन, बसवराज भुजबळ, शिवानंद स्वामी आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाचे यश

लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था संचलित श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, १९० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

शाळेतील ५ विद्यार्थिनींनी १०० टक्के, ८३ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक तर १८३ विद्यार्थिनींनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव आशिष बाजपाई, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सूर्यप्रकाश धुत, मुख्याध्यापिका सुनीता बोरगावकर, सुनंदा कुलकर्णी आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

जिजामाता विद्यालयाचे दहावी परीक्षेत यश

लातूर : एमआयडीसी परीसरातील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला असून, विद्यालयातून स्नेह साळुंके प्रथम, प्रेमकुमार डागा द्वितीय तर अजिंक्य गिरी याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

विशेष प्रावीण्यासह ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंतामध्ये तनुजा कमलाकर, निकिता कोरके, प्रियदर्शनी सोनवणे, स्वाती कदम, पूजा वाळके यांचा समावेश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षक आ.विक्रम काळे, प्राचार्या शुभांगीताई काळे, प्राचार्य अनिल काळे, मुख्याध्यापिका सलीमा सय्यद, राजकुमार शिंदे, सुभाष म्हेेत्रे, प्रा.बाबासाहेब सोनवणे, प्रा.चंद्रकांत सूर्यवंशी, शंकर पांचाळ, व्ही.जी. वाघमारे, बी.जी. गुडे, बालाजी साबळे, अप्पासाहेब देशमुख, अर्जुन कांबळे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.