देवणी तालुका कोरोनामुक्त ; जिल्ह्यात २४९ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यातील चाकूर, जळकोट, शिरूर अनंतपाळ, उदगीर आणि अहमदपूर तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे. सद्यस्थितीत चाकूरमध्ये ३, जळकोटमध्ये १, शिरूर अनंतपाळमध्ये १, उदगीर ७ आणि अहमदपूरमध्ये १४ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर देवणी तालुका आजघडीला कोरोनामुक्त झाला आहे.
औसा तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ६४ असून, त्या खालोखाल मनपा हद्दीत ७४, लातूर तालुक्यात ३६, रेणापूर तालुक्यात २१, निलंगा तालुक्यात २७ असे एकूण २४९ रुग्ण जिल्ह्यामध्ये उपचाराधीन आहेत.
कोरोना नियमांचे पालन करा अन् कोरोनामुक्त व्हा
जिल्ह्यातील देवणी तालुका कोरोनामुक्त झाला आहे. चाकूर, जळकोट, उदगीर, शिरूर अनंतपाळ हे तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. सर्वच तालुके कोरोनामुक्त होण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, नियमित मास्क आणि वारंवार हात धुवा, जेणेकरून कोरोना संसर्गाची लागण होणार नाही, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.