शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आता मिशन अ‍ॅडमिशन

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

लातूर : जून महिन्यातील पहिला आठवडा संपला आहे. सीबीएसई पॅटर्नच्या दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. बारावीचाही निकाल नुकताच लागला आहे.

लातूर : जून महिन्यातील पहिला आठवडा संपला आहे. सीबीएसई पॅटर्नच्या दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. बारावीचाही निकाल नुकताच लागला आहे. आता दहावी बोर्डाचा निकाल १७ जून रोजी जाहीर होणार आहे. उर्वरित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल एक-दोन आठवड्यांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. निकालानंतर सर्वांचेच ध्येय ‘मिशन अ‍ॅडमिशन’चे आहे. त्यामुळे जिल्ह्यात ११ वीच्या नेमक्या जागा किती, अन्य अभ्यासक्रमाच्या संदर्भात किती आदी संदर्भातील आकडेवारी.दहावी व बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश लातूर जिल्ह्यातील पोरांनी मिळविले. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या प्रवेशपूर्व परीक्षेतही लातूरच्या विद्यार्थ्यांचा दबदबा वाढतच आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईकडील विद्यार्थ्यांचा ओढा लातूर शहरात वाढला आहे. परिणामी, अकरावीच्या प्रवेशासाठी स्थानिकांसह बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. नुकत्याच जाहीर झालेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयातील विविध प्रवर्गातील पहिले पाच विद्यार्थी राज्यात पहिले आले आहेत. दयानंद महाविद्यालयाच्याही विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. त्यामुळे बाहेरच्या विद्यार्थ्यांना लातूरचे आकर्षण वाढले आहे. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयानेही सीईटी परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवल्याने तिकडेही विद्यार्थ्यांचा ओढा आहे.लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि अहमदपुरातील महात्मा गांधी महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षीच चढाओढ होते. आता दहावीचा निकाल १७ जूनला लागणार असल्याने या तिन्ही महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयांनी क्षमतेनुसार प्रवेश देण्याची तयारी केली आहे. या तिन्ही नामांकित महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयेही आता स्पर्धेत आली आहेत. नुकत्याच लागलेल्या सीईटीच्या परीक्षेत ते दिसून आले आहे. (प्रतिनिधी)पदव्युत्तर आणि संशोधनातही लातूर...अकरावी, बारावी आणि सीईटीपुरते मर्यादित शिक्षण लातुरात आहे. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनात जिल्हा मागे आहे, असा काहींचा समज आहे. परंतु, ‘शाहू’, ‘दयानंद’, ‘बसवेश्वर’, ‘सुशिलादेवी’ विद्यापीठ उपकेंद्रांतील विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनात आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेशही हाऊसफुल्ल होत आहे.अकरावीतील प्रवेश स्थिती