शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

श्री गणेशाेत्सव, ज्येष्ठागाैरी आणि नवरात्र उत्सवात माेठ्या प्रमाणावर गाेड खाद्यपदार्थ आणि मिठाईला मागणी असते. दरवर्षी मिठाईची भाववाढ १५ ते ...

श्री गणेशाेत्सव, ज्येष्ठागाैरी आणि नवरात्र उत्सवात माेठ्या प्रमाणावर गाेड खाद्यपदार्थ आणि मिठाईला मागणी असते. दरवर्षी मिठाईची भाववाढ १५ ते २५ टक्क्यांनी केली जाते. कच्च्या मालाचे भाव वाढल्याच्या कारणावरून ही दरवाढ करण्यात येत असल्याचे दुकानदारांकडून सांगितले जात आहे.

तेल, कच्च्या मालाचे भाव वाढले...

मिठाईसह विविध गाेड खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यातच खाद्यतेल दुपटीवर गेले आहे. दूध आणि साखर किंचित वाढली आहे. ३६ रुपये किलाे असणारी साखर आता ३८ रुपयांवर गेली आहे. उच्च प्रतीचे दूध ६० रुपये लिटरने मिळते. मिठाई महाग वाटत असली तरी ती तयार करण्यासाठीही माेठा खर्च आहे. - स्वीटमार्ट चालक

गॅस, खाद्यतेल आणि इंधन दरवाढीमुळे लागणाऱ्या कच्च्या मालात माेठी घसघशीत वाढ झाली आहे. गवर्षीच्या दरात यंदाही मिठाई विक्री करणे शक्य नाही. आम्हालाही भाववाढ करावं असे कधीच वाटत नाही. पण, नाइलाज असताे, एकंदरीत तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा मेळ घालूनच दर ठरविले जातात.

- स्वीटमार्ट चालक

दरांवर नियंत्रण काेणाचे?

स्वीटमार्ट चालक दरवाढीचे कारण सांगत असतील तरी या दरावर नियंत्रण काेणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडत आहे. दरवर्षी मिठाईसह इतर गाेड खाद्यपदार्थांचे दर वाढतात. सणासुदीच्या दिवसात मागणी वाढली की दर वाढतात, असा अनुभव ग्राहकांना आहे.

दरवाढीबाबत ग्राहकांना पडलेले प्रश्न

सध्याला मिठाईसह इतर गाेड खाद्यपदार्थांच्या भावात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. श्री गणेशाेत्सव, ज्येष्ठागाैरी आणि नवरात्र उत्सवात मिठाईला ग्राहकांतून माेठी मागणी असते. हीच संधी शाेधून दुकानदारांकडून भाववाढ केली जात आहे. - साहेबराव किनीकर, लातूर

दूध, साखर आणि इतर खाद्यपदार्थांचे दर किंचित वाढले आहेत. अशा स्थितीत स्वीटमार्ट चालकांकडून करण्यात येणारी भाववाढ चुकीची आहे. या भाववाढीवर नेमके नियंत्रण काेणाचे आहे, हा प्रश्न ग्राहकांना कायम पडत असताे. - तानाजी लातूरकर