मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात दररोज १०७ टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी १२० गाड्या आहेत. काही प्रभागांत त्या नियमित येतात, तर काही नगरांमध्ये त्या कधीमधी येतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा घंटागाडीकडे दिला जातो; परंतु त्यात अनियमितता असल्याने गैरसोय होत आहे. मनपाने शहरात चार ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीचे प्रकल्प उभे केले आहेत. तर सुका कचरा वरवंटी डेपोवर टाकला जात आहे.
चार ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया
ओला आणि सुका कचऱ्याचे संकलन केले जाते. शहरात ओला कचऱ्यासाठी चार ठिकाणी प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित आहेत. त्या ठिकाणी ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते.
शासकीय काॅलनी, विवेकानंद चौक, पाण्याची टाकी परिसर, राजस्थान शाळेच्या पाठीमागील मनपा शाळा आणि गरुड चौक परिसरात प्रक्रिया केंद्र आहे. या चार प्रक्रिया केंद्रांवर खतनिर्मिती केली जाते. सुका कचरा मात्र वरवंटी डेपोवर पाठविला जातो.
शहरात दररोज घंटागाडीद्वारे वर्गीकरण करून कचरा संकलन केले जाते. ओल्या कचऱ्यावर शहरातच प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते. सुका कचरा मात्र वरवंटी डेपोवर पाठविला जातो. त्या ठिकाणी वर्गीकरण करून खतासाठी कचरा वेगळा केला जातो, तर उर्वरित कचरा सिमेंटसाठी बाजूला केला जातो. शहरात कचरा संकलनासाठी १२० गाड्या आहेत. दररोज १०७ टन कचरा संकलनाचे काम केले जाते. कचरा व्यवस्थापन हाताळण्यासाठी मनपाच्या टीमसह खाजगी एजन्सी कार्यान्वित आहे.
-चंद्रकांत बिराजदार, उपमहापौर