शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आता रेशनवर मिळणार मका अन्‌ बाजरी; मार्चपासून होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 14:10 IST

भरडधान्य योजनेचा लाभ रेशनवर मिळणार असल्यामुळे मार्च महिन्यात चपातीऐवजी बाजरीची भाकरी खावी लागणार आहे

ठळक मुद्देगहू व मका द्यावाच. सोबतच दर महिन्याप्रमाणे गहू व तांदूळही द्यावामका का दिला जात आहे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे.

लातूर : रेशन दुकानातून गहू, तांदूळ व धान्य दिले जाते. मार्चमध्ये बाजरी आणि मकादेखील दिला जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. मका आणि बाजरी मिळणार असल्याने गहू कमी प्रमाणात वाटप केला जाणार आहे.

जिल्ह्यात एकूण पाच लाख नऊ हजार २७० शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये एपीएल ६६ हजार ३००, अंत्योदय ४२ हजार, तर केशरी तीन लाख ३० हजार ६९ कार्डधारक आहेत. भरडधान्य योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानावर मार्च महिन्यात बाजरी व मका दिला जाणार आहे. प्राधान्याने कुटुंब व एपीएल कार्डधारकांना दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ दिले जात होते. अनेकांच्या शेतात गहू पिकविला जात नसल्यामुळे त्यांना गव्हाची जास्त आवश्यकता असते. मात्र, भरडधान्य योजनेचा लाभ रेशनवर मिळणार असल्यामुळे मार्च महिन्यात चपातीऐवजी बाजरीची भाकरी खावी लागणार आहे, तर मक्याचा जास्त वापर केला जात नाही. त्यामुळे मका का दिला जात आहे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे. शासनाने गहू व मका द्यावाच. सोबतच दर महिन्याप्रमाणे गहू व तांदूळही द्यावा, अशी मागणी रेशन कार्डधारकांमधून होत आहे.

किलोचे दर दोन व तीन रुपयेरेशनच्या लाभार्थ्यांसाठी दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ दिला जातो. मका आणि बाजरीदेखील याच किमतीत दिले जाणार आहे. मार्च महिन्यापासून लातूर जिल्ह्यात मका आणि बाजरीचे वितरण करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

मार्चपासून होणार वाटपपुरवठा विभागाकडून मार्चमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या बाजरी व मक्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या ठिकाणी किती धान्य पाठवायचे, याचे नियोजन सुरू असून, नियतनानुसार पुरवठा केला जाणार आहे. रेशन दुकानदार व तालुकास्तरावर याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.- जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे.

रोजच्या जेवणात भाकरीपेक्षा चपातीचा वापर जास्त केला जातो. शेतातील गहू बाजारात दाखल झालेला नाही. रेशनच्या दुकानात गहू मिळतो, तोच मार्च महिन्यात मिळाला पाहिजे.- लाभार्थी

बाजरी मिळाली तर भाकरी करता येईल. मात्र मक्याचा कशासाठी वापर करावा, हा प्रश्न आहे. शासनाने गहू, तांदूळ पूर्वीप्रमाणेच द्यावा व बाजरीही मक्याऐवजी अधिक द्यावी. - लाभार्थी

जिल्ह्यातील एकूण लाभार्थीएपीएल ६६३००अन्त्योदय ४२०००केशरी ३,३०,०६९

टॅग्स :laturलातूर