शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST

लातूर : ओबीसी समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी तातडीने पावले उचलून हक्काचे आरक्षण सन्मानाने परत द्यावे. जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण ...

लातूर : ओबीसी समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी तातडीने पावले उचलून हक्काचे आरक्षण सन्मानाने परत द्यावे. जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नयेत. त्याचबरोबर अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल, अशी ग्वाही राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाला असून ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका नकोत, अशी भूमिका घेत भाजपाच्यावतीने बुधवारी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे याकरीता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणतीही ठोस भूमिका किंवा त्या अनुषंगाने पावलेही उचललेली नाहीत. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला निधी दिला नाही. न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. राज्य सरकारच्या या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला असून या निवडणुका होणार नाहीत यासाठी प्रयत्न करून राज्य सरकारने तत्काळ ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संजय दोरवे, बापूराव राठोड, शैलेश गोजमगुंडे, विक्रम शिंदे, तात्याराव बेद्रे, विजय क्षीरसागर, दिलीप धोत्रे, प्रेरणा होनराव, ज्ञानेश्वर चेवले, देवा गडदे, शिरीष कुलकर्णी, शिवसिंह सिसोदिया, दिग्विजय काथवटे, गोरोबा गाडेकर, भागवत सोट, प्रशांत पाटील, हणमंत नागटिळक, चंद्रसेन लोंढे, बन्सी भिसे, उषा रोडगे, गणेश गोमचाळे, विपुल गोजमगुंडे, आदिनाथ मुळे, धनराज शिंदे, प्रवीण सावंत, सतीश बिराजदार, काशीनाथ ढगे, भैरवनाथ पिसाळ, विनायक मगर, अमोल गिते, महादेव कानगुले, ज्योतिराम चिवडे, अमोल गिते, संतोष तिवारी आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.