भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, शहर संघटक सरचिटणीस मनिष बंडेवार, अजितसिंह पाटील-कव्हेकर, सूर्यकांतराव शेळके, निळकंठराव पवार उपस्थित होते. या कायद्यामुळे शेतकरी व निर्यातदारांच्या धान्य साठवणीवर बंधने असणार नाहीत. केवळ नैसर्गिक संकट, युध्द, अतिमहागाई याबाबत शासनाचा हस्तक्षेप राहणार आहे. तसेच या कायद्यामुळे ए.पी.एम.सी.बाहेर शेतीमाल विक्री व खरेदीचा अधिकार एक देश एक बाजार ही कल्पना स्वीकारून शेतमाल नियमनमुक्त केला आहे. यामुळे आपल्या शेतकऱ्यांना आपले धान्य कोठेही विकता व खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्याला हाताशी धरून त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करून केवळ राजकीय द्वेषातून विरोधासाठी विरोध केला जात आहे. असेही कव्हेकर म्हणाले.
केंद्राने केलेला कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST