शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

लातूर, रेणापूर, औशात चार लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी संताेष गुलाब शिंदे (४२, रा. म्हाडा काॅलनी, लातूर) यांच्या घराचा कडी-काेयंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी साेमवारी ...

पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी संताेष गुलाब शिंदे (४२, रा. म्हाडा काॅलनी, लातूर) यांच्या घराचा कडी-काेयंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी साेमवारी रात्री घरात प्रवेश केला व लाेखंडी कपाट ताेडून साेन्याची बाेरमाळ, मणीमंगळसूत्र असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत फिर्यादी अभिमन्यू संदिपान शिंदे (२९, रा. नवीन आदर्श काॅलनी, औसा राेड, लातूर) यांच्या घराचे किचनच्या पाठीमागील दार उघडे हाेते. या दारातून अज्ञात चाेरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील साेन्याचे दागिने, चांदीचे माेठे ताट, तीन चांदीच्या वाट्या, एक ग्लास, एक नाणे आणि राेख रक्कम असा एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १३ सप्टेंबरच्या रात्री घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत फिर्यादी साहेबराव धाेंडिबा चव्हाण (५३, रा. साेनचिंचाेली, ता. औसा) हे १३ सप्टेंबरराेजी रात्री झाेपले असता, अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दाराची कडी काढून आत प्रवेश केला. घरात ठेवलेली ७० जुनी चांदीची नाणी, दीड ताेळ्याचे साेन्याचे दागिने, दहा साड्या असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत भादा पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणापूर येथे तीन घरे फाेडली...

एकाच रात्री रेणापूर येथील तीन घरे फाेडल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ७१ हजारांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केला आहे. रेणापूर येथील सानेगुरुजी भागात काही जण सणानिमित्त आपल्या गावाकडे गेले हाेते. दरम्यान, शहाजी काळे, मुकुंद गाेविंद झंपलवाड आणि श्रीमंत व्यंकटराव पवार यांच्या घरात अज्ञात चाेरट्यांनी प्रवेश केला. यावेळी साेन्याच्या दागिन्यांसह राेख रक्कम असा एकूण ७१ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चाेरट्यांनी पळविला. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचानामा केला आहे. शिवाय, श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनीही पाहणी केली आहे. श्वानाने रेणापूर पिंपळफाटा राेडपर्यंत माग काढला. चाेरट्यांनी चारचाकी वाहनातून पलायन केले असावे, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे.