शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भेसळ रोखण्यासाठी मिठाई विक्रेत्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

गौरी-गणपतीसह अन्य सणानिमित्ताने बाजारपेठेत मिठाईसह अन्य अन्न पदार्थांना मोठी मागणी असते. विशेषत: दूध व दुग्धजन्य पदार्थांपासूनच्या पदार्थांना ग्राहकांची पसंती ...

गौरी-गणपतीसह अन्य सणानिमित्ताने बाजारपेठेत मिठाईसह अन्य अन्न पदार्थांना मोठी मागणी असते. विशेषत: दूध व दुग्धजन्य पदार्थांपासूनच्या पदार्थांना ग्राहकांची पसंती असते. अशा परिस्थितीत भेसळयुक्त पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. अशा प्रकारचे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री होऊ नये, म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मिठाई दुकानांवर करडी नजर ठेवली आहे.

विक्रेत्यांनी मिठाईत कोणत्याही प्रकारचा अखाद्य रंग, कृत्रिमरीत्या गोडी आणणाऱ्या पदार्थांचा वापर करू नये. शिळी, बुरशी आलेल्या मिठाईची विक्री करू नये, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त द.वि. पाटील यांनी करून ते म्हणाले, अन्नपदार्थ व्यावसायिकांनी पदार्थांची विक्री करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळून आल्यास अथवा कुठलीही तक्रार आल्यास तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.

दिशाभूल केल्यास कार्यवाही...

अन्न पदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांची दिशाभूल करु नये, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. मिठाई पॉकेटवर उत्पादकाचा पत्ता, मिठाईचे नाव, उत्पादन दिनांक, त्याचा वापर करण्यापर्यंत दिनांक, तसेच साठवणुकीबाबतची माहिती स्पष्ट देणे गरजेचे आहे. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास कार्यवाही केली जाईल.

- द.वि. पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.