कुठे कुठे केली काॅस्ट कटिंग...
१ काेराेनाच्या प्रादुर्भावाने अनेकांच्या जगण्यात बदल झाला आहे. आहे त्या पैशात बचत, काटकसर करण्याशिवाय सध्याला पर्याय नाही. आराेग्य, शिक्षणावर बहुतांश कुटुंबांचा खर्च झाला आहे. तर कपडे खरेदी, काैटुंबिक कार्यक्रम टाळणे, प्रवास आणि हाॅटेलिंग बंदच करण्यात आला आहे.
२ काेराेनानंतर लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर बाजारात भाजीपालाही मिळत नव्हता, अशावेळी कडधान्याला प्राधान्य देण्यात आले. भाजीपालाही माेजकाच खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. मुलांसाठी बाहेरुन येणाऱ्या फास्टफुडवर बंद करण्यात आले.
३ जे खायचं ते घरातच तयार करण्यावर भर दिला गेला. यातून पैशांची बचत झाली. शिवाय, आराेग्यही सांभाळता आले. अनावश्यक आणि चैनीवर हाेणाऱ्या खर्चाला कात्री लावण्यात आली.
कडधान्याला प्राधान्य दिल्याने बचत...
शहरात राहणाऱ्यांनी भाजीपाला महाग झाल्याने कडधान्याला प्राधान्य देत बचत केली. गृहिणींनी आहारात बदल केला. कधी भाजीपाला तर कधी डाळींवर भर दिला. शिवाय, घरात खाद्य पदार्थ बनविण्याला प्राधान्य दिल्याने बाहेरील पार्सलसेवाही बंद झाली. यातून पैशांची बचत करता येते, हेच काेराेनाने शिकविले.
शिक्षणावरील अवांतर खर्चाला कात्री...
शाळा सुरू झाल्यानंतर हाेणारा खर्च माेठा असताे. मात्र, काेराेना काळात शैक्षणिक शुल्क वगळता इतर खर्च टाळता आला आहे. स्कूल व्हॅनला लाणाऱ्या पैशांची बचत झाली. शिवाय, सांस्कृतिक कार्यक्रमावर हाेणारा खर्चही बंद झाला. मात्र, ऑनलाइनसाठी नेटवर्किंगचा खर्च वाढला आहे.
प्रवासावर हाेणारा खर्च टाळता आला...
गत मार्च २०२० पासून प्रवास ठप्पच झाला आहे. आता घरातच शाळा, कार्यालयीन कामे ऑनलाइन सुुरू असल्याने प्रत्यक्ष प्रवास करण्याची गरज भासली नाही. यातून प्रवासासाठी लागणाऱ्या पैशांची बचत झाली आहे. शिवाय, हाॅटेलिंगही बंद असल्याने हा खर्च टाळता आला आहे. काेराेनाने अनेक बाबतीत बचतच शिकविली आहे.