शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

झटपट साेयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

सन २०१७च्या हंगामामध्ये ३ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी साेयाबीनचा पेरा घेतला हाेता. या पेऱ्यामध्ये दरवर्षी वाढ झाली असून, ...

सन २०१७च्या हंगामामध्ये ३ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी साेयाबीनचा पेरा घेतला हाेता. या पेऱ्यामध्ये दरवर्षी वाढ झाली असून, २०१८मध्ये ३ लाख ५० हजार हेक्टर, २०१९मध्ये ३ लाख ९० हजार हेक्टर, २०२०मध्ये ४ लाख १० हजार हेक्टर आणि २०२१मधील हंगामात ४ लाख २७ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी साेयाबीनला प्राधान्य देत आहेत. लातूर जिल्ह्यात साेयाबीनपाठाेपाठ उसाला प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ३० हजार हेक्टरपैकी ४ लाख २७ हजार हेक्टरवर यंदा साेयाबीनचा पेरा झाला आहे.

झटपट येणारे साेयाबीन...

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्या - दुसऱ्या पावसानंतर साेयाबीनचा पेरा केला जाताे. झटपट येणाऱ्या साेयाबीनच्या बियाण्याची लागवड केल्यानंतर जवळपास तीन महिन्यात हे पीक काढणीच्या स्थितीत येते. त्यामुळे प्रारंभीला आणि मध्ये कधीही पावसाने हजेरी लावली तरी या पिकाला त्याचा फायदाच हाेताे.

मध्यम कालावधीत येणारे साेयाबीन...

मध्यम कालावधीत येणाऱ्या साेयाबीनचा पेरा हादेखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात हाेतो. लागवड झाल्यानंतर ऑक्टाेबर महिन्यात पीक काढणीला येते. सध्याला या पिकाची स्थिती चांगली असून, यंदा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे.

जास्त कालावधीत येणारे साेयाबीन...

या साेयाबीनचा कालावधी हा पूर्ण चार महिन्यांचा असताे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या साेयाबीनची काढणी ऑक्टाेबरमध्ये हाेते. जास्त कालावधीसाठी लागवड झालेल्या साेयाबीनच्या पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसला.

चांगल्याचा पावसाचा फायदा...

यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाला आहे. परिणामी, साेयाबीनला फायदा झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबल्याने पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे साेयाबीन पाण्यात हाेते. - दत्तात्रय गावसाने, कृषी अधीक्षक, लातूर

मध्यम कालावधीत येणाऱ्या साेयाबीनपासून शेतकऱ्यांच्या पदरी चांगले उत्पादन मिळेल. सायाेबीन काढणीनंतर लागलीच विक्री करावे, असे नाही. ते घरात ठेवून याेग्य भाव आल्यानंतरही विकता येते. बाजारातील आवक आणि भाव पाहून विक्रीचा निर्णय घेता येताे. शिवाय, रान लवकरच रिकामे हाेते. - हणमंतराव मुळे, किनी

साेयाबीनला यंदाच्या हंगामात प्रतिक्विंटल दहा हजारांवर भाव मिळाला. मात्र, या काळात बाजारातील आवक अल्प हाेती. आवक वाढली की, भाव काेसळतात. हे पीक आर्थिक उत्पन्न देणारे आहे. शिवाय, जमिनीचा पाेतही सुधारण्यासाठी फायदा हाेताे. त्याचबराेबर पशुधनासाठी भुसाही चारा म्हणून मिळताे. साेयाबीनची लागवड शेतकऱ्यांना परवडणारी आहे. - अंबादास चिखले, वाढवणा