शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी भालकीच्या हिरेमठ संस्थानचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

बिदर जिल्ह्यातील भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामीजी यांनी महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महात्मा बसवण्णा आणि ...

बिदर जिल्ह्यातील भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामीजी यांनी महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महात्मा बसवण्णा आणि लिंगायत धर्म साहित्य प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य मोठ्या प्रमाणात केले आहे. तसेच ते सुरूही आहे. याशिवाय त्यांनी आजवर अनेक अनाथ मुलांचे संगोपन केले आहे. गरीब व होतकरू मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली असून, हजारो मुलांचे जीवन फुलविले आहे.

याविषयी प्रसिद्धी पत्रकात स्वामीजींनी म्हटले आहे की, देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दररोज शेकडो रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कामगार, शेतमजूर, कष्टकरी आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असलेले लाखो कुटुंबे हवालदिल झाली आहेत. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने काही घरांतील कर्त्या आई- वडिलांचे निधन झाले आहे. अशा मुलांचे भविष्य अंधकारमय होऊ नये म्हणून अशा मुलांचे पूर्णत: संगोपन करण्याची जबाबदारी भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी स्वीकारणार आहेत. अधिक माहितीसाठी भालकी मठाचे नूतन मठाधिपती श्री गुरुबसव पट्टदेवरू स्वामीजी, मठाचे व्यवस्थापक मोहन रेड्डी आणि महाराष्ट्र बसव परिषदेचे संचालक राजू जुबरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हजारो मुलांचे जीवन फुलविले...

भालकीच्या हिरेमठ संस्थानने आजपर्यंत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांचे जीवन फुलले आहे. सध्याचे कोरोनाचे संकट मोठे आहे. अशा परिस्थितीत आधाराची गरज आहे. त्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.