...
वराहांमुळे औसा येथील नागरिक त्रस्त
औसा : शहरातील जुन्या वस्ती व गल्ली परिसरात मोकाट वरांचा त्रास वाढला आहे. अनेकदा अचानक वराह समोर येत असल्याने दुचाकीस्वार वाहनावरुन पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय, घाणीमुळे उच्छाद वाढला आहे. त्यामुळे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर शेख इस्माईल इमामसाब, खुर्शीद शेख, इरशाद शेख, आबीद शेख, अखिल शेख, अमजद शेख आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
...
विकेल ते पिकेल अंतर्गत गूळ विक्री सुरु
लातूर : देवणी तालुक्यातील धनेगाव येथे संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत सेंद्रिय गूळ विक्रीस सुरुवात झाली. शेतक-यांचा शेतमाल थेट उपलब्ध होत असल्याने ग्राहकांनाही लाभ होणार आहे.
...
शेतरस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत
जळकोट : वांजरवाडा येथील बसस्थानक परिसरातून शेताकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी मातीकाम झाले होते, परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे, ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी मागणी तहसीलदारांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर माधव शिवनगे, रामराव होनराव, ग्यानोबा कुंडले, मन्मथ होनराव, पार्वती शिवनगे, सुषमा मस्कले, प्रभाकर बनसोडे, दीपक बनसोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.