शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार; उपाययोजनांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनामुळे सतत कामाच्या तणावात असलेल्या पोलीस आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा वाढतच आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनामुळे सतत कामाच्या तणावात असलेल्या पोलीस आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा वाढतच आहे. हा थकवा कमी करण्यासाठी ना सुटी मिळतेय, ना कुटुबीयांसाठी पुरेसा वेळ देता येतोय. त्यामुळे मानसिक थकवा घालविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुटी मिळणे कठीण झाले आहे. तर संचारबंदीत सतत रस्त्यावर कार्यरत राहून गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त कालावधी वाढला आहे. अशा स्थितीत मागील एक ते दीड वर्षांपासून हे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. सेवा प्रथम, या ध्येयाने पोलीस आणि आरोग्य कर्मचारी आपली सेवा बजावीत आहेत; मात्र कोरोनामुळे कामाचे तास आणि ताण वाढला असल्याने मानसिक थकवा दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

संचारबंदीमुळे पोलीस दिवस-रात्र कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. त्यामुळे सामाजिक संस्थांच्या मदतीने हेल्पलाइनची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्याद्वारे बाधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जात होता. नवीन उपक्रम राबविण्याचा मानस आहे. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आरोग्य कर्मचारी सेवा बजावत आहेत. सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने कामाचा व्यापही वाढला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहावे, ताण-तणाव कमी व्हावा, यासाठी विपश्यनाचा पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभाग अंमलबजावणी करीत आहे.

- डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी

आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विपश्यनाबाबत निर्णय झाला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. कामाचा वेळ वाढला असल्याने थोडा थकवा आहे. उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- आरोग्य कर्मचारी

आम्ही सुरक्षित राहिलो तर आमचे कुटुंब सुरक्षित राहील. कामाचा ताण सहन करावा लागत असून, वेळही वाढविण्यात आला आहे. कमी कर्मचारी असताना अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे मानसिक थकवा दूर करण्याची गरज आहे. - आरोग्य कर्मचारी

संचारबंदीमुळे बंदोबस्तावर तैनात राहावे लागत आहे. काम आणि बंदोबस्तामुळे कुटुंबीयांना वेळही देणे अवघड झाले आहे. योगासने, प्राणायाम, मन शांत राहण्यासाठी वेगवेगळी शिबिरे घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

- पोलीस कर्मचारी

कामाचा ताण वाढल्याने किमान साप्ताहिक सुटी मिळणे गरजेचे आहे. तणावमुक्त राहण्यासाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. साप्ताहिक सुटी मिळाल्यास कुटुंबीयांसाठी वेळ देता येईल. योगा, प्राणायामचे वर्ग घेण्याची आवश्यकता आहे. - पोलीस कर्मचारी