शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा २२ गावांना फटका, ११ साठवण तलाव भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

दोन दिवसांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील करंजी, सोनवळा, हळद वाढवणा, जिरगा, जंगमवाडी, डोंगरकोनाळी, ...

दोन दिवसांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील

करंजी, सोनवळा, हळद वाढवणा, जिरगा, जंगमवाडी, डोंगरकोनाळी, गुत्ती १,२, धोंडेवाडी, वांजरवाडा, सिंदगी, माळहिप्परगा, रावणकोळा, डोंगरगाव, शेलदरा हे साठवण तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तालुक्यातील जवळपास दीडशे पाझर तलाव असून ते भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

घोणसी गटात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या भागातील नदी, नाले वाहू लागले आहेत. पाझर, साठवण तलाव भरले असून नदीला पूर आला आहे. या पावसाचा २२ गावांना फटका बसला आहे. अतनूरपासून वाहणाऱ्या नदीचे पाणी गावात घुसल्याने घराघरांत पाणी होते. त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

तसेच अतनूर, रावणकोळा, मेवापूर, चिंचोली, शिवाजीनगर तांडा, फकरुतांडा, सांगवी, गव्हाण, सुल्लाळी, डोंगरगाव आदी परिसरातील वाडी तांड्यावर पाणीच पाणी झाले होते. जवळपास ५०० एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वांजरवाडा परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, उमाकांत इंगळे, अनिल ढोबळे, पांडुरंग परीट, दत्ता इंदुरे, अभंग मोरे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ अधिकारी व्ही.एस. सूर्यवाड, तलाठी तानाजी भंडारे यांनी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली.

ओला दुष्काळ जाहीर करा...

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करावा. कर्जमाफी द्यावी. हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी आणि जळकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तालुक्यातील मोठ्या प्रकल्पासह पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात पूर्णपणे जलसाठा झाल्याने आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे.