शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २०० गावांत कचरा संकलन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

उस्मानाबाद : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यात दोन टप्प्यांत २०० गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला ...

उस्मानाबाद : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यात दोन टप्प्यांत २०० गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गावांत कचरा संकलन केंद्र, घंटागाडी, प्रत्येक घरी दोन कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ६२ ते ६३ कोटींची तरतूद आहे.

आजही अनेक गावांत सांडपाण्याची व्यवस्था नसते. पाणी रस्त्यावरून वाहते. मोक्याच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी याकरिता १६ संस्था नियुक्त केल्या आहेत. या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील २०० गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५५ तर दुसऱ्या टप्प्यात १४५ गावांत कामे केली जाणार आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून ६२ ते ६३ कोटींची तरतूद केली आहे.

या निधीतून प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबासाठी दोन कचराकुंड्या पुरविण्यात येतील. डोअर टु डोअर कचरा संकलनासाठी बॅटरीवर चालणारी घंटागाडी, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू नयेत यासाठी सार्वजनिक कचराकुंडी, प्रत्येक घरासाठी शोषखड्डा तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयेही उभारण्यात येणार आहेत. एवढेच नाहीतर, प्रत्येक गावात कचरा संकलन केंद्रही उभारले जाणार आहे.

चौकट...

प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र...

२०० गावांत कचरा संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांत संकलित होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण केले जाईल. यातून निघणारा प्लास्टिक कचरा एकत्रित करून तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचरा प्रोसेसिंग युनिटला पाठविला जाईल. अशा एका युनिटवर १६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे युनिट असेल.

...तर पीव्हीसी पाइप गटार

पाच हजार व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पीव्हीसी पाइप गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अशा गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

कोट....

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ५५ गावांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच कामे सुरू होतील. हा प्रकल्प राबविण्यासाठी १६ संस्थांची निवड केली आहे.

- अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.