शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मुगापाठोपाठ उडदाचीही आवक, आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

उदगीर : उदगीर मार्केट यार्डात खरिपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली असून, गुरुवारी जवळपास ५०० क्विंटलपेक्षा जास्त आवक ...

उदगीर : उदगीर मार्केट यार्डात खरिपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली असून, गुरुवारी जवळपास ५०० क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली. शेतमालात ओलावा आणि चार दिवसांपासूनच्या पावसामुळे डाग पडल्याने दरात फरक पडला आहे. सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० प्रतिक्विंटल भाव मिळत असून, केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा बाजारात जास्त भाव मिळत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर असलेल्या उदगीर येथील मार्केट यार्डात मूग व उडदाची आवक महाराष्ट्रापेक्षा बाजूच्या कर्नाटकातून, नांदेड जिल्ह्यातून आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात होते. केंद्र शासनाने हमीभाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे; परंतु प्रत्यक्षात बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे यंदा हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

यंदा जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. तालुक्यात १ हजार २०५ हेक्टरवर उडदाचा पेरा झाला आहे. तालुक्यातील एकूण ६४ हजार हेक्टर खरिपाच्या क्षेत्राच्या तुलनेत हा पेरा कमीच आहे. त्यातच जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने उडदाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले. त्यामुळे बाजारात आवक मर्यादित होत आहे. जी आवक आहे, ती शेजारील नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांतील व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून होत आहे. परवा तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे उडदामध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात असल्याने आणि डाग लागल्याने चांगल्या शेतमालाच्या तुलनेत सर्वसाधारण उडदाला कमी दर मिळत आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

गुरुवारी येथील मार्केट यार्डात ५०० क्विंटलपेक्षा जास्त उडदाची आवक झाली. यावर्षी सर्वच पिकांची स्थिती चांगली असून, उत्पादनही कमी होत असल्याने दरही स्थिर राहणार नाहीत, असे व्यापारी सांगत आहेत. साधारणपणे उडदामध्ये १२ टक्के ओलावा असावा; परंतु सध्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. येथील बाजारातील उडदाला दिल्ली, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या तामिळनाडू व आंध्र प्रदेशात येथून उडीद जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आता पावसाने उघडीप दिल्याने येणाऱ्या काळात उडदाच्या राशीला वेग येईल.

दरात घसरण होण्याची आशा कमी...

उदगीरच्या बाजारात येणाऱ्या उडदाला दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. सध्या आयातीत उडदाची आवक कमी असल्याने येथील शेतमालाला चांगली मागणी असल्याने दरही चांगले मिळत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने उडदाच्या राशींना वेग येईल; परंतु दरात फारशी घसरण होणार नसल्याचे व्यापारी लक्ष्मीकांत चिकटवार यांनी सांगितले.