शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरुन पडले प्रेमात, पळून जाताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

पोलिसांनी सांगितले, बिहार राज्यातील पाटणा येथील सुरज सुधीर वर्मा (२३) या तरुणाची सोशल मिडियावरुन वाढवणा बु. हद्दीतील एका गावातील ...

पोलिसांनी सांगितले, बिहार राज्यातील पाटणा येथील सुरज सुधीर वर्मा (२३) या तरुणाची सोशल मिडियावरुन वाढवणा बु. हद्दीतील एका गावातील १५ वर्षीय मुलीसोबत ओळख झाली. त्यांची मोबाईलवर चॅटिंग सुरू झाली. मोबाईलवरील खेळातून ते एकत्र येऊ लागले. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्या तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. त्यामुळे तीही तयार झाली. त्यामुळे तो पाटण्याहून मुंबई (कुर्ला), पनवेल व तेथून रेल्वेने उदगीरला पोहोचला. उदगीरहून मोबाईलवरून मुलीच्या गावचे लोकेशन मिळाल्याने १ सप्टेंबर रोजी रात्री तो मुलीच्या गावात पोहोचला. त्यानंतर ते दोघे लातूररोड येथे गेले आणि तेथून नांदेड-पूर्णा-किनवट मार्गे पूर्णा- पाटणा रेल्वेने बिहारला जात होते.

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी वाढवणा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने वाढवणा पोलिसांनी तपास सुरू केला. अपहृत मुलीस बिहार राज्यातील सुरज वर्मा याने पळवून नेल्याची माहिती मिळाली. वाढवणा पोलिसांनी सायबर शाखेला त्या तरूणाच्या मोबाईलच्या क्रमांकाचे लोकेशन शोधण्यास सांगितले असता किनवट परिसरात असल्याचे दिसून आले. त्यामुळे तात्काळ वाढवणा बु. ठाण्याचे सपोनि. नौशाद पठाण यांनी मुलीचा फोटो किनवट पोलिसांना पाठवला आणि येथील कर्मचाऱ्यांचे पथक किनवटकडे पाठवले. किनवट पोलिसांच्या मदतीने वाढवणा पोलिसांनी आरोपी व मुलीस किनवट रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.

आरोपीस पोलीस कोठडी...

सदरील आरोपीस न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडीत ठेवण्यात आले आहे तर मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे, असे वाढवणा बु. ठाण्याचे सपोनि. नौशाद पठाण यांनी सांगितले.