जळाकाेट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासाठी जळकाेट येथे मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. उप-जिल्हाधिकारी मेंगशेट्टी म्हणाले की, वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे, सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर कुठलाही गैरप्रकार हाेणार नाही, यासाठी दक्षता बाळगण्याची गरज आहे. मतदान केंद्रावर जाताना मतदान यंत्रणांची तपासणी करून घ्यावी, मतदानाचे साहित्य सोबत घेऊन जावे, मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही, यांचीही काळजी घ्यावी. मतदान केंद्रावर मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर अडचणी आल्यास संबंधिताना तातडीने कळवावे. निवडणुकीच्या काळात हलगर्जी चालणार नाही. हयगय, हालगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही उप-जिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी म्हणाले.
यावेळी तहसीलदार संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार स्वामी, मंडळ अधिकारी एस.व्ही. सुरेवाड, तलाठी युवराज करेप्पा यांच्यासह कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.