शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कोरडी आभाळमाया..!

By admin | Updated: July 22, 2014 00:16 IST

रमेश शिंदे , औसा पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.

रमेश शिंदे , औसापावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये अजूनही पेरण्या झाल्या नाहीत. पेरण्या झालेले ५० टक्के क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. जे उगवले त्यांना आता पावसाची गरज आहे. परंतु, दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री चांदणे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर दुष्काळाचे काजवे चमकू लागले आहेत़ जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये एकवेळा बऱ्यापैकी तर दोन-तीन वेळा अल्प पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. त्यातही सोयाबीनच्या बियाणाने मोठा दगा दिला. तालुक्यातील जवळपास २५ हजार हेक्टर्स क्षेत्रावरील सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा दिसून येत आहे. तालुक्यावर दिवसभर दाटून येणारे ढग बरसत नाहीत. ते आता पावसाचे नव्हे, तर दुष्काळाचे संकेत देऊ लागले आहेत. पाणीटंचाई कायम आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुबार पेरण्या कराव्या लागत आहेत. आता पाऊस नाही आला तर काय होणार, या भीतीने सर्वांच्याच मनात काहूर निर्माण झाले आहे.औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. पेरण्यांना तब्बल महिनाभर उशीर होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने काळ्या आईची ओटी भरली. ७० ते ८० हजार हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या उरकल्या; पण आता पाऊसच नाही. वर्षभर औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाने छळले. आधी अवकाळी, त्यानंतर गारपीट तर आता पुन्हा दुष्काळाचे गडद सावट दिसत आहे़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जवळचे सर्व काही संपले. बँका आणि खाजगी सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे आता शेतकरी हतबल होताना दिसत आहे. मागील वर्षी औसा तालुक्यात २१ जुलैपर्यंत २६१ मि.मी. पाऊस झाला होता. पण यावर्षी मात्र आजपर्यंत केवळ १२४.१४ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ८१३.०९ मि.मी. इतकी आहे. यावर्षी पावसाळ्याचे जवळपास ४० ते ४५ दिवस संपले, तरीही अत्यंत तोकडा पाऊस झाला आहे. तालुक्यातील आशिव, मातोळा, उजनी या पट्ट्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे दिवसभर ढग असले तरी ढगांची कोरडीच माया दिसत आहे. सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी-तांड्यांवर १९ अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. अजून चार दिवस पाऊस नाही झाला तर आणखी गावांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पाऊस नसल्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे. दिवसभर आभाळात ढगांची गर्दी असते. पाऊस मात्र पडत नाही. रात्री चांदण्या दिसतात. दिवसभर आभाळात ढग दिसत असले तरी ‘ढगांची कोरडी माया, दुष्काळाची गडद छाया’ असे चित्र आता औसा तालुक्यात स्पष्ट दिसत आहे.चारा आणि पाणीटंचाईला प्राधान्य...सध्याच्या परिस्थितीसंदर्भात तहसीलदार दत्ता भारस्कर म्हणाले की, जिल्हास्तरावरून दुष्काळाचा सामना करण्याचे नियोजन तयार आहे. सध्या तालुक्यातील पाणीटंचाई आणि जनावरांसाठी चाराटंचाई या दोन प्रश्नांवर दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे भारस्कर यांनी सांगितले.