विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी १ हजार १७४ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ६१ पाॅझिटिव्ह आढळले. तर २ हजार ३९ व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ११८ बाधित आढळले. दोन्ही चाचण्या मिळून १७९ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान रविवारी २२ रूग्णांचा मृत्यू झाला. यातील ११ जणांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक होते. चाैघाजणांना कोरोनासह अन्य व्याधी होत्या. तर ७ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते. सध्या उपचार घेत असलेल्या २ हजार ३६८ रूग्णांपैकी २८५ आयसीयू, ११ गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर, १२५ बीआयपी व्हेंटिलेटरवर, ४२७ रूग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर, १७३ रूग्ण विना ऑक्सिजनवर, १६३२ रूग्ण मध्यम लक्षणाचे आहेत.
रुग्ण दुपट्ट दिवसाचा कालावधी दिलासादायक
n आतापर्यंत ८४ हजार ३४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९४ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी २६८ दिवसांवर गेला आहे. ही बाबा दिलासादायक असली तरी मृत्यूचे प्रमाण २.३ टक्के आहे. यामुळे चिंता आहे. आरोग्य विभाग सदर प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.