तालुक्यातील एकूण ८७ पैकी ६१ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. इच्छुकांना प्रथम राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करावे लागत आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक निर्णय अधिका-यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागत आहे. त्यामुळे इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी शहरातील विविध महा-ई- सेवा केंद्रात इच्छुकांनी रांगा लावल्या आहेत.
एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुमारे अर्धा ते एक तास वेळ लागत आहे. शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे राज्य निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सोय होती. दरम्यान, अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सोमवारी दाखल करण्यात आले आहे.
बँकेत स्वतंत्र खाते काढण्यास गर्दी...
तालुक्यातील सुमठाणा येथून २, मल्लापूर- १, मादलापूर- १, हंडरगुळी- १९, वागदरी- २, माळेवाळी- ३, शिरोळ जा.- ९, शेल्लाळ- १०, वाढवणा बु.- २, कोदळी- १, लोहारा- ८, हिप्परगा डा.- २, एकुर्का रोड- १ , बेलसकरगा- ९, धडकनाळ- १, करडखेल- १०, गंगापूर- १, कौळखेड- ४, कुमठा खु.- १३, तादलापूर- ७, चांदेगाव- १, लोणी- १०, हेर- १६, करखेली- ८, गुरधाळ- ३, वाढवणा खु.- २९, निडेबन- ३२, पिंपरी येथून ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
गावागावातील पॅनल प्रमुखांची सक्षम उमेदवारांचा शोध घेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. तसेच निवडणूक लढविणार्या उमेदवारांचे राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड बँकेमध्ये स्वतंत्र बचत खाते आवश्यक असल्याने बँकेत खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे.