शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चाकुरात कोरोनाचा आलेख उतरला; तालुक्यात ८१६ ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

चाकूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे चाकूर तालुक्यात बाधितांच्या संख्येत घट ...

चाकूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे चाकूर तालुक्यात बाधितांच्या संख्येत घट होत आहे. सध्या तालुक्यात एकूण ८१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट ही वेगाने पसरली. याच कालावधीत नागरिकांकडून शासन नियमांकडे दुर्लक्ष राहिले. पहिल्या लाटेवेळी प्रत्येक गावांनी काळजी घेतली होती. परंतु, या लाटेवेळी नियमांचे पालन करण्याकडे उदासीनता दिसून आली. परिणामी, संसर्ग वाढत गेला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून १४ एप्रिल रोजी रात्रीपासून ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले. परंतु, सुरुवातीस हे निर्बंध नावालाच ठरत होते. दरम्यान, शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू करीत संचारबंदी केली. याशिवाय, ८ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. याच कालावधीत महसूल, आरोग्य, पोलीस, पंचायत समिती प्रशासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू केले.

तालुक्यात १५ एप्रिल ते १० मे या कालावधीत २ हजार १३ कोरोना रुग्ण वाढले. कडक लॉकडाऊनमुळे बाधितांचा आलेख उतरला आहे. तालुक्यात १५ एप्रिल रोजी ८३४ ॲक्टिव्ह रुग्ण होते. ३० एप्रिलेला १ हजार १९१ होते. ८ मे रोजी १ हजार १४ ॲक्टिव्ह रुग्ण होते तर १० मे रोजी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ८१६ पर्यंत पोहोचली आहे.

३० एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६२ होती. १० मे पर्यंत होती. त्यात एकने वाढ होऊन ती ६३ वर पोहोचली आहे. दरम्यान, तालुकाबाह्य ठिकाणी उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. १५ एप्रिल रोजी १५२, ३० एप्रिलला २८५, ८ मे २८४ तर १० मे रोजी २४५ रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या घटत आहे. १५ एप्रिलला ५३७, ३० एप्रिलला ७५८, ८ मे रोजी ६३९ तर १० मे रोजी ४९७ रुग्ण होते.

परिस्थितीनुसार निर्बंध असावेत...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिस्थितीनुसार लॉकडाऊन होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक व्हायला हवी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते कमी करावे. नागरिकांनीही लॉकडाऊननंतर फिजिकल डिस्टन्स पाळावे. मास्कचा वापर करावा.

- मिलिंद महालिंगे, माजी नगराध्यक्ष.

नियमांची कडक अंमलबजावणी...

कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यापारी, मध्यमवर्गीय, मजुरांची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाऊन असताना नियम कडक करावेत. पुन्हा पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याची गरज नसावी. त्यामुळे कोरोनावर मात करता येईल.

- रूपाली पवार, माजी नगराध्यक्ष.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज...

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचे जे पालन करीत आहेत, त्यांचे व्यापार बंद आहेत. सध्या कडक अंमलबजावणीमुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु, बाजारपेठही चालली पाहिजे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- नारायण बेजगमवार, व्यापारी