महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार पालकमंत्री अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आ. धिरज देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या सूचनेनुसार पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात जळकोट तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहरातील पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, जि.प.सदस्य बाबूराव जाधव, तालुका उपाध्यक्ष दत्ता पवार, महेताब बेग, धोंडीराम पाटील, संग्राम कांबळे, संग्राम नामवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, शाहूर बंडे, दिलीप पांचाळ, महेश सतापुरे, बालाजी शिवशेट्टे, संदीप उगीले, मुसा सय्यद, तैयब शेख, प्रा. राजेंद्र वाघमारे, प्रदीप काळे, अंकुश करडे, विठ्ठल लोहकरे, सुधाकर सोनकांबळे, धनराज दळवे, दाऊत पटेल, गजानन मगर, विष्णुकांत जायभाये, संतोष डुमने, विश्वनाथ जाधव, किशोर कांबळे, विठ्ठलराव भोकरे, तानाजी मगर, पंडित करडे, रवीकुमार करडे, माधव सतापुरे, भागवत माळी, दत्तात्रय बापूराव पवार, भानुदास तीर्थे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जळकोटात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST