शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेती मशागतीबरोबर खतांचेही दर वाढल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

नागरसोगा : कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत इंधनाचे दर वाढल्याने शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली ...

नागरसोगा : कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत इंधनाचे दर वाढल्याने शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांचे भावही २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. सततच्या उत्पन्नामुळे जमिनीचा कस कमी होतो. सध्या सेंद्रिय खताच्या तुटवड्यामुळे शेतीला रासायनिक नत्र, स्फुरद, पालाश या घटकाची गरज भासते. त्यामुळे संतुलित वापर केल्यावर उत्पन्नात वाढ होते. काही दशकांपासून सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खताकडे शेतकरी वळले आहेत. मे महिन्यात शेतकरी शेतीतील मशागतीची कामे आटोपून खते बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत असतात.

कोरोनाच्या संकटामुळे सध्या कृषी सेवा केंद्र बंद आहेत. शेतकरी बाजारात खरेदीसाठी गेला असता १५:१५:१५, १२:३२:१६, १०:२६:२६ आदी रासायनिक मिश्र खताच्या मागे २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच डिझेलचे भाव वाढल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा शेती मशागतीस नांगर, कुळव, मोगडणे, रोटर, सरी आदी कामांच्या दरात ट्रॅक्टर मालकांनी २० ते ३० टक्के वाढ केली आहे. शेती मशागतीचा दर, रासायनिक खतांची भाववाढ व पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणांचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी सोयाबीनच्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. शासनाकडून अथवा कंपनीकडून शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही.

शेतकऱ्यांपुढे संकट कायम...

कोरोनाच्या संकटामुळे शेतातील भाजीपाला व शेतमालाचे भाव कोसळले आहेत. त्यातच रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे खतांचा आवश्यक तेवढाच वापर करणे गरजेचे ठरत आहे. यंदा खत, यंत्रावरील मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे, असे येथील शेतकरी रविशंकर जवादे म्हणाले.

कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे व कमतरता भासत असल्यामुळे आणि डिझेलच्या दरवाढीवर वाहतूक महागली आहे. त्याचा परिणाम रासायनिक खताच्या दरवाढीवर होत असल्याचे वितरक सांगत आहेत, असे दापेगाव येथील कृषी केंद्र चालक सुनील कावळे म्हणाले.