यंदाच्या खरीप हंगामापासून शेतक-यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीस काही शेतक-यांचे सोयाबीन बियाणे न उगवल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे हतबल झाला. काही शेतक-यांची तुरीवर आशा होती. परंतु, वातावरणातील बदलामुळे तुरीवर खराटा झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त तुरीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, सचिव कृष्णा जाधव, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, सुरेश शेवाळे, कार्तिक भिकाणे, तुळशीदास माने, जयराम गायकवाड, मारोती पाटील, हरिदास कांबळे, अर्जुन राठोड, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.
करप्यामुळे तुरीचे नुकसान, शेतकऱ्यांना भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST