शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या जुन्या भिंतीना कॉलमचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

केळगाव : निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीस पावसाळ्याच्या दिवसांत गळती लागत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत ...

केळगाव : निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीस पावसाळ्याच्या दिवसांत गळती लागत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत होती. दरम्यान, प्रशासनाने शाळादुरुस्तीस सुरुवात केली आहे. मात्र, जुन्या भिंतीना सिमेंटच्या कॉलमचा आधार दिला जात आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

खडक उमरगा येथे जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेची इमारत ही जवळपास १९९० ते ९३ च्या कालावधीत बांधण्यात आली आहे. हे काम चांगल्या दर्जाचे न झाल्याने पावसाळ्यात इमारतीच्या छतास गळती लागत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांना बसण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. परिणामी, शाळेसाठी नवीन इमारत बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.

शाळेच्या इमारतीची ही दुरवस्था पाहून प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु, इमारतीच्या भिंती न पाडता त्या ठिकाणीच सिमेंट काँक्रीटचे कॉलम उभारण्यात येत आहेत. भिंती जुन्या असल्याने त्या काढून नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गावातील धनाजी ढोकरे, उद्धव भुरे, तुकाराम कदम, महादेव कदम, शिवराज ढोकरे, अनिल पाटील, अंगद सुरवसे, आदींनी केली आहे.

शाळा पाच-सहा वर्षांपासून पावसाळ्यात गळत होती. शाळेच्या इमारतीच्या स्लॅबच्या भिंती भिजून गुळगुळीत झाल्या आहेत. सध्या शालेय विभागाच्या वतीने जुन्या भिंती ठेवून नवीन कॉलम टाकून काम करण्यात येत आहे. त्यामुळे धोका होण्याची भीती नाकारता येत नाही, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.

निधी कमी असल्याने शाळेच्या जुन्या भिंती ठेवून चार वर्गखोल्यांवर नवीन कॉलम उभारून छत टाकण्यात येत आहे. नवीन इमारतीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांनी सांगितले.