शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धाेका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

प्रतिकारशक्ती कमी... श्वसनसंस्थेशी निगडित असलेल्या अस्थमा आजारामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी हाेत आहे. परिणामी, अशा रुग्णांना इतर विषाणूंचा धाेका निर्माण ...

प्रतिकारशक्ती कमी...

श्वसनसंस्थेशी निगडित असलेल्या अस्थमा आजारामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी हाेत आहे. परिणामी, अशा रुग्णांना इतर विषाणूंचा धाेका निर्माण हाेताे. या रुग्णांनी खबरदारी म्हणून आराेग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी हाेणार नाही, यासाठी गरम, उबदार कपड्यांचा वापर करण्याची गरज आहे.

बालकालाही अस्थमाचा त्रास...

अस्थमाने केवळ वयाेवृद्धांना त्रास हाेत नाही, तर युवक आणि लहान बालकांनाही अस्थमाचा त्रास सहन करावा लागत आहे. मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण फारसे नसले तरी, अनुवंशिकता आणि अलर्जीमुळे बालकांना अस्थमाचा त्रास जाणवायला लागला आहे.

अशी घ्यावी काळजी...

डाॅक्टरांनी दिलेले नियमित वापराचे औषध कुठल्याही परिस्थितीत बंद करू नका. औषध वेळेवर घेणे हा महत्त्वाचा उपाय आहे. अलर्जी असणाऱ्या वस्तूंशी संपर्क टाळा. अनेकदा दम्याबराेबर अलर्जी सर्दीसुद्धा साेबत असते. नाकातील स्टेराॅइड स्प्रे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करावा. ढगाळ वातावरणात जुन्या अस्थमाच्या रुग्णांना त्रास हाेताे. परिणामी, रुग्णांनी उपचारात कुठलाही खंड पडू देऊ नये, असेही डाॅक्टरांनी सांगितले.

आबालवृद्धांची अधिक काळजी घ्या...

सध्या बदललेल्या वातावरणाचा सर्वांनाच त्रास हाेत आहे. अशा स्थितीत अस्थमाच्या रुग्णांनी पहाटेच्या काळात उठू नये, फिरायचे असेल तर सकाळी आठनंतर फिरावे. पहाटेच्या थंडीत श्वसनाचे आजार अधिक उद्भतात. यासाठी पहाटेच्या वेळी गरम, उबदार कपड्यांचा वापर केला पाहिजे. शिवाय, नियमित औषधाेपचार घेतले पाहिजेत. अस्थमाचा त्रास हाेत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, आजी-आजाेबा, लहान बालकांची अधिक काळजी घ्यावी.

- डाॅ. विश्रांत भारती, लातूर