शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन जाेडीदार शाेधताना सावधान; हात पिवळे हाेण्याआधीच खिसा रिकामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

अशी हाेऊ शकते फसवणूक... १ साेशल मीडियात जाेडीदार शाेधताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. समाेरचा व्यक्ती काेण आहे. त्याच्याशी आपली ...

अशी हाेऊ शकते फसवणूक...

१ साेशल मीडियात जाेडीदार शाेधताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. समाेरचा व्यक्ती काेण आहे. त्याच्याशी आपली ओळख झाली तरी, पावले टाकताना सावधपणे टाका. कारण तुम्हाला सांगितलेली प्रत्येक गाेष्ट खरीच असते असे नाही. यासाठी प्रत्येक बाबींची खातरजमा करून घ्या. काही संशय आल्यास संबंधित पाेलीस ठाण्यांशी संपर्क साधवा.

२ फेसबुक, व्हाॅटस् ॲप आणि इतर माध्यमातून झालेली ओळख आणि त्यातून प्रेमात झालेले रूपांतर हे अनेकदा फसवे असते. समोरचा व्यक्ती हा एखाद्या मुलीच्या नावाने बनावट अकाैंट तयार करून समाेरच्या व्यक्तीला जाळ्यात ओढताे आणि त्यातून लाखाे रुपयांना फसवणूक हाेते. हे टाळण्यासाठी प्रत्येक गाेष्टींची खातरजमा केलीच पाहिजे.

फसवणूक टाळण्यासाठी दक्षता बाळगा...

वयात आलेली तरुण मुले-मुली आपल्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. त्याच भावनेला हात घालून काेणीतरी आपल्याशी साेशल मीडियावर संपर्क करताे. मग त्यातून चॅटिंगचा प्रकार वाढताे. रात्र-रात्र चॅटिंग आणि एकमेकांशी भावना शेअर केली जाते. त्यातून ते एकमेकांमध्ये गुंतून जातात. याचाच फसवणूक करणारा बनावट अकाैंट तयार करून फायदा घेताे. अशावेळी नेटकऱ्यांनी अतिशय जबाबदारीने साेशल मीडिया हाताळला पाहिजे. काेसाेदूर असलेला महाठग आपल्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करताे. हे टाळण्यासाठी सतत जागरूकता बाळगली पाहिजे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

सध्याला ऑनलाईन जाेडीदार शाेधण्याला प्राधान्य दिले जाते आहे. व्हाॅटसॲप ग्रुपवर आलेल्या बायाेडाटावरून मुला-मुलींचे स्थळ शाेधले जात आहेत. हे करत असताना प्रत्येक मुला-मुलींनी आणि त्यांच्या माता-पित्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

साेशल मीडियातून जाेडीदाराचा शाेध घेताना अनेकदा समाेरून दिसणारे व्यक्तिमत्त्व फसवे असते. मिळालेली माहितीही खाेटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रत्येक गाेष्टींची खातरजमा केलीच पाहिजे.

जाेडीदार शाेधताना संशय आला तर संवाद थांबवावा शिवाय, त्याबाबत अधिक चाैकशी करावी, कुठलाही व्यवहार, बाेलाचाली करू नये. अनेकदा समाेरून ब्लॅकमेलिंगची धमकी दिली जाते.

अशावेळी जवळच्या पाेलीस ठाण्याशी, सायबर क्राईमशी संपर्क साधून मदत घ्यावी. त्यातून आपली हाेणारी फसवणूक नक्कीच टाळता येईल. जागरूकता हाच उत्तम पर्याय आहे.