शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा प्रकल्पात एकूण साठा ५१ तर उपयुक्त पाणीसाठा ३८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : लातूर शहरासह कळंब, धारूर, केज, अंबाजोगाई, लातूर एमआयडीसी तसेच मुरुड, औसा एमआयडीसी आदी मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : लातूर शहरासह कळंब, धारूर, केज, अंबाजोगाई, लातूर एमआयडीसी तसेच मुरुड, औसा एमआयडीसी आदी मोठ्या शहरांना पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात यंदाही चांगला संचय होत आहे. जून महिन्यापासून प्रकल्पात ४३.१०५ दलघमी नवीन पाणीसाठ्याचा संचय झाला आहे. सध्या धरणात ५१.२३ टक्के एकूण पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३८.२५ टक्के झाला आहे.

पावसाळ्यापूर्वी मांजरा प्रकल्पात ७१.७१७ दलघमी पाणीसाठा होता. आता ११४.८२२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. जवळपास ४३.१०५ दलघमी नवीन पाण्याची भर प्रकल्पात पडली आहे. त्यामुळे लातूरसह धारूर, केज, कळंब, अंबाजोगाई, मुरुड, लातूर आणि औसा एमआयडीसीसह छोट्या-मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या प्रकल्पात ६७.६९२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, पाणी पातळी ६३९.१० मीटरवर आली आहे. एकूण पाणीसाठा ५१.२३८ तर उपयुक्त पाणीसाठा ३८.२५ टक्के इतका झाला आहे.

प्रकल्पातील पाण्याची सद्यस्थिती....

एकूण साठा : ११४.८२२ दलघमी

उपयुक्त पाणीसाठा : ६७.६९२ दलघमी

पाणी पातळी : ६३९.१० मीटर

एकूण पाणीसाठा : ५१.२३८ टक्के

उपयुक्त पाणीसाठा : ३८.२५ टक्के

जूनपासूनची आवक : ४३.१०५ दलघमी

प्रकल्पीय क्षमता...

एकूण पाणीसाठा : २२४.०९४ दलघमी

उपयुक्त पाणीसाठा : १७६.९६४ दलघमी

मृत पाणीसाठा : ४७.१३० दलघमी

पूर्ण संचय पातळी : ६४२.३७ मीटर