शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

लातूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, ...

लातूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने कृषी विभाग, विमा कंपनी, तहसील कार्यालय व दत्तक बँकेकडे सादर करता येणार आहेत.

जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ७२ तासात पिकांचे नुकसान विमा कंपनीस कळविणे आवश्यक असले तरी, त्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत होती. ही बाब लक्षात घेता, शासनाच्यावतीने नवीन सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती तात्काळ देण्यास मदत होणार असून, नुकसानीची आर्थिक मदत मिळण्यास सहकार्य होणार आहे.

फोटो कॅप्शन...

रेणापूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे पिकात पाणी साचले होते. त्यामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आधी काय होते दोन पर्याय...

१. पूर्वी शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करून पीक नुकसानीची माहिती द्यावी लागत होती. अनेकदा टोल फ्री क्रमांक लागत नसल्याने गैरसोय होत होती.

२. शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आता माहिती देणे बंधनकारक आहे. पूर्वी त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे पिकांच्या नुकसानीचा फोटो आणि अर्जात माहिती भरावी लागत होती.

हे आहेत सहा नवीन पर्याय...

१. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज कृषी विभागात सादर करता येईल.

२. ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे. त्या बँकेतही अर्ज कागदपत्रांसह भरता येणार आहे.

३. तहसील कार्यालयातही नुकसानीचा प्रस्ताव दाखल करता येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता गरजेची आहे.

४. विमा कंपनीच्या कार्यालयातही नुकसानीची माहिती अर्जासह शेतकऱ्यांना सादर करता येणार आहे.

५. विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अर्ज क्रमांक सांगून नुकसानीची माहिती देता येईल.

६. ही सर्व माहिती ७२ तासात देणे गरजेचे आहे. विमा कंपनीच्या ई-मेलचा पर्यायही उपलब्ध आहे.

पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान...

जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

८२ तासांचा अवधी...

विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायांद्वारे ७२ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या पर्यांयांचा अवलंब करून ७२ तासात अर्ज करावेत.

- संतोष भोसले, विमा कंपनी प्रतिनिधी