शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

हरंगुळ (बु.) येथून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:21 IST

अहमदपूर शहरात ६१ हजारांची घरफोडी लातूर : घराच्या खिडकीचे रॉड तोडून अज्ञाताने प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे ...

अहमदपूर शहरात ६१ हजारांची घरफोडी

लातूर : घराच्या खिडकीचे रॉड तोडून अज्ञाताने प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६१ हजारांचा मुद्देमाल पळविल्याची घटना ५ ते २८ जुलैदरम्यान घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद आहे. फिर्यादी प्रदीप मारुती फुलसे (४१, रा. फुलसेवाडी, ता. अहमदपूर) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. रोख ४१ हजार आणि दागिने असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर करीत आहेत.

ट्रकला अज्ञात वाहनाची धडक

लातूर : नांदेड रोडवरील कृषी महाविद्यालयानजीक ट्रक उभा करून चालक गेला असता अज्ञात वाहनाने ट्रकला धडक दिली. या अपघातात जवळपास ४० हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना २९ जुलै रोजी घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. फिर्यादी बबन राम शिंदे (३०, रा. बोथी, ता. चाकूर) याने आपल्या ताब्यातील ट्रक एमएच २४ बीई २७८९ महामार्गालगत थांबविला होता. दरम्यान, या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. याबाबत विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा नोंद आहे. तपास पोलीस नाईक जागीरदार करीत आहेत.

गंजगोलाई परिसरातून मोटारसायकलची चोरी

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात एका ज्वेलर्स दुकानासमोर मोटारसायकल थांबविली होती. ती अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना २५ जुलै रोजी घडली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद आहे. फिर्यादी श्रीहरी किशन सोनटक्के (२८, रा. जमालपूर, ता.जि. लातूर) यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच २४ एफ ८३६३) एका ज्वेलर्स दुकानासमोर थांबविली होती. ती अज्ञाताने पळविली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

रिंग रोड परिसरातून दुचाकीची चोरी

लातूर : शहरातील नवीन रेणापूर नाका ते नांदेड नाका रिंग रोड परिसरात थांबविलेली मोटारसायकल अज्ञाताने पळविल्याची घटना १९ ते २० जूनदरम्यान घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी सिद्धेश्वर बाबूराव चिल्लरगे (३४, रा. तत्तापूर) यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच २४ एडी २२३१) थांबविली होती. दरम्यान, ती अज्ञाताने पळविली. याबाबत विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा नोंद आहे.

रुग्णालय परिसरातून वाहनाची चोरी

लातूर : शहरातील एका खासगी रुग्णालय परिसरात थांबविलेली मोटारसायकल अज्ञाताने पळविल्याची घटना २८ ते २९ जुलैच्या दरम्यान घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. फिर्यादी राहुल राजाभाऊ राठोड (२०, रा. टाकळी, ता. परळी) यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच १३ बीएस ४८१६) रुग्णालय परिसरात थांबविली होती. दरम्यान, ती अज्ञाताने पळविली. याबाबत शिवाजीनगर पोलिसात अज्ञातावर गुन्हा नोंद आहे. तपास पोहेकॉ. भताने करीत आहेत.