शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा कायम; सप्टेंबरमध्ये आढळले १४ पॉझिटिव्ह रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर आजच्या तारखेपर्यंत एकूण ७८ नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी जून महिन्यामध्ये वलांडी २, वांजरवाडा २, ...

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर आजच्या तारखेपर्यंत एकूण ७८ नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी जून महिन्यामध्ये वलांडी २, वांजरवाडा २, लातूर शहर २ आणि रचन्नावाडी येथे २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. जून व जुलै महिन्यात एकूण बावीस डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण १४ रुग्णांची त्यात भर पडली आहे. जळकोट १, हकनकवाडी १, नळगीर २, उदगीर १, निलंगा शहर २, हंडरगुळी १, चाकूर २, एकुर्गा खुर्द १, दावणगाव १ आणि रेणापूर शहरात १ रुग्ण आढळला आहे.

दरम्यान, रेणापूर शहरात २०, लातूरमध्ये ३ आणि वलांडी येथील ६ असे २९ नमुने नांदेडच्या प्रयोगशाळेत गुरुवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, सदर रुग्णांवर संशयित म्हणून उपचार सुरू आहेत. डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डेंग्यूचा कहर जिल्ह्यात सुरूच आहे. हिवताप कार्यालय तसेच मनपाचा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत धूर फवारणी अबेटिंग मोहीम सुरू करण्यात आली आहे. अबेटिंग मोहिमेचा दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, तरीही डेंग्यूचा कहर सुरूच आहे. त्यामुळे लातूर मनपाने कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.

डेंग्यू संशयित रुग्ण दररोज वाढत आहेत...

लातूर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये

थंडी ताप खोकला सर्दी अशा लक्षणांच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. शंभर ते दीडशे या लक्षणांच्या रुग्णांची संख्या असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक....

दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बाल रुग्णालयांची ओपीडी वाढलेली आहे. ताप, खोकला, सर्दी तसेच अशक्तपणा अशा आजारांची रुग्ण वाढले आहेत.

कोट.....

जून ते जुलै या दोन महिन्यांमध्ये २२ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात १४ रुग्णांची त्यात भर पडली आहे. सद्य:स्थितीत २९ रक्त नमुने तपासणीसाठी नांदेडच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ज्या भागात रुग्ण आढळले, त्या भागात धूर फवारणी, अबेटिंग फवारणी करण्यात येत आहे.

डॉ. आर. आर. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी