शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मानव कल्याणासाठी ईश्वराचे सहाय्यक बना;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

लातूर: आपल्या व समाजाच्या हितासाठी ईश्वरीय आदेशाचे आयुष्यात पालन करणे गरजेचे आहे. समाजहितासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक असून, ईश्वराचा ...

लातूर: आपल्या व समाजाच्या हितासाठी ईश्वरीय आदेशाचे आयुष्यात पालन करणे गरजेचे आहे. समाजहितासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक असून, ईश्वराचा मानव कल्याणासाठी जो संदेश आहे़. त्याला समजून तो अंमलात आणला तर आम्ही निश्चितच ईश्वराचे सहाय्यक बनू, असे प्रतिपादन जमाअतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तौफिक असलम खान यांनी केले.

शहरातील हमीदिया मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंद द्वारा आयोजित ’कूनू अन्सारूल्लाह अर्थात अल्लाहचे सहाय्यक बना’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तौफिक असलम खान म्हणाले, आज देशामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, एक दिवसही असा जात नाही की महिलांविरूद्ध हिंसा किंवा बलात्कार होत नाही. व्याजाच्या विळख्याने अनेक लोकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, श्रीमंत लोक गरीबांची लूट करीत आहेत, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, सरकार स्वतःच्या बळावर समाजाचे व्यापक हित साध्य करू शकत नाही. नागरिकांनाही सरकारच्या मदतीसाठी पुढे यावे लागेल असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचा आरंभ मुफ्ती अब्दुल्लाह यांच्या कुरआन प्रवचनाने झाला. प्रास्ताविक शहराध्यक्ष अशफाक अहेमद यांनी केले. एम.आय.शेख यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद आरीफ यांनी जमाअते इस्लामी हिंदचा परिचय करून दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी, शहराध्यक्ष अशफाक अहेमद, जिल्हाउपाध्यक्ष आरीफ शेख, अर्शद फलाही, अन्वरूल्लाह इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.