शिक्षक, कर्मचारी संघटनेचे आज आंदोलन
लातूर - राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशता अनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. सोमवारी सकाळी १२ वाजता शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या या आदेशाची होळी करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार, संस्थाचालक संघटनेचे रामदास पवार, डी.एन. केंद्रे, सी.व्ही. चोले, पांडुरंग देडे, अमोल चामे, सोमनाथ स्वामी यांनी केले आहे.
क्षयरोग, कुष्ठरोग शोधमोहीम अंतिम टप्प्यात
लातूर - आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात क्षयरोग, कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम राबविली जात आहे. यासाठी १ हजार ८५७ पथके नियुक्त केली आहेत. आतापर्यंत जवळपास ८.५ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये घरोघरी जाऊन एक पुरुष, एक महिला स्वयंसेवकांच्या वतीने सर्वेक्षण केले जात आहे. १५ डिसेंबरपर्यंत सदरील मोहीम चालणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मुक्तांगण स्कूलमध्ये अभिवादन कार्यक्रम
लातूर - शहरातील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कविता लाटे, प्राचार्या सुमेरा शेख, माधुरी वाघमारे, अश्विनी केंद्रे, कमल मुंडे यांची उपस्थिती होती. यासोबतच लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण लाटे, रऊफ शेख, मकरंद सबनीस, नम्रता डांगे, रुपाली कोकाटे, गणेश इरकर, विद्या कदम यांची उपस्थिती होती.
न्यू संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने साहित्य वाटप
लातूर - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील न्यू संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने स्वयंसिद्धा महिला व बालविकास केंद्र येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश फड, वैभव घोबाळे, तुकाराम फड, शामसुंदर मुरकुटे, प्रफुल्ल मुरकुटे, सुनील भांगे, व्यंकटी ढाकणे, विक्रम भांगे, ज्ञानदेव फड, नामदेव फड, आकाश फड उपस्थित होते.