शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकाचा पाण्यात बसून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

शिरूर अनंतपाळ : शहरातून जाणारा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटचा तयार करण्यात आला आहे. परंतु, रस्त्याचे काम दर्जेदार झाले ...

शिरूर अनंतपाळ : शहरातून जाणारा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटचा तयार करण्यात आला आहे. परंतु, रस्त्याचे काम दर्जेदार झाले नसल्याने रस्ता काही ठिकाणी चढला तर काही ठिकाणी सखल भाग झाला आहे. त्यामुळे थोडासाही पाऊस झाला तरीही मुख्य प्रवेशद्वारावर जागोजागी तळे साचते. परिणामी, रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. साचलेल्या पाण्यात बसून एका नागरिकाने आंदोलन केले.

शिरूर अनंतपाळ शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील वाहतूक दुहेरी व्हावी म्हणून दुभाजकाचे काम करण्यात आले असून, दोन्ही बाजूंनी सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु, सिमेंट रस्त्याचे काम अभियांत्रिकी कौशल्य वापरून झाले नसल्याने रस्ता काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी खोल झाला आहे. भूरभूर पाऊस झाला तरी खोलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्याचा वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शिवाय, पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर साचलेले पाणी चुकविण्यासाठी अनेकजण एकेरी मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला वळताना दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, वाहने स्लिप होऊन पडत आहेत. शहरातून जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, अशी नागरिक, वाहनधारकांतून मागणी आहे.

सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष...

शहरातून जाणारा राज्य मार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हा रस्ता चांगला तयार करणे गरजेचे आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

रस्त्याच्या दुतर्फा गटारी...

मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारींचे बांधकाम झाले तर सिमेंट रस्त्यावरील सखल भागात थांबणारे पाणी वाहून जाऊ शकते आणि नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. परंतु, मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारीचे बांधकाम अर्धवट झाले असल्याने जागोजागी तळे साचत आहे.

गटारीच्या बांधकामास मंजुरी...

मुख्य रस्त्यावरील सखल भागात साचणाऱ्या तळ्याबाबत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र पवार म्हणाले, सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटर गटारीच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे. कार्यारंभ आदेश मिळताच बांधकाम सुरू होईल.